काही दिवसांपूर्वीच टीम इंडियाचा क्रिकेटपटू हार्दिक पांड्याने आपली पत्नी नताशा स्टॅनवीकसोबत घटस्फोट घेत असल्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला. मागील दोन-तीन महिन्यांपासून त्यांचा घटस्फोट होण्याचा चर्चा सुरु होत्या आणि आता अधिकृतपणे आता त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. या बातमीनंतर आता सर्वत्र त्याच्या वेगळ्या होण्याची चर्चा होत आहे. घटस्फोटानंतर हार्दिक नताशाला किती पैसे देईल? तसेच नताशाला हार्दिकच्या संपत्तीतला किती वाटा मिळेल? असे अनेक प्रश्न आता त्याच्या चाहत्यांना पडत आहेत.
आज आम्ही तुम्हाला घटस्फोटासंबधीची माहिती सांगणार आहोत. तुम्ही अनेकदा ऐकले असेल की, घटस्फोटानंतर नवऱ्याला आपल्या बायकोला पोटगीमध्ये पैसे द्यावे लागतात मात्र तुम्हाला माहित आहे का? काहीवेळी बायकोलाही नवऱ्याला पैसे द्यावे लागू शकतात. मागेच एका घटनेत असे घडले होते, ज्यात एका बायकोने नवऱ्याला पैसे दिले होते, ते सुद्धा करोडो रुपये.
हेदेखील वाचा – मुस्लिम बांधव हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात? जाणून घ्या कारण
मागील वर्षी एका जोडप्याने घटस्फोट घेतला. त्यांच्या लग्नाला 25 वर्षांहून अधिक काळ लोटला होता. या घटस्फोटानंतर पत्नीला आपल्या पतीला एकूण 10 कोटी रुपयांची एलिमनी द्यावी लागली होती. घटस्फोटाच्या प्रकरणात बऱ्याच लोकांना असे वाटते की, नवऱ्यालाच देखभाल आणि एलिमनीपोटी पत्नीला पैसे द्यावे लागतात. घटस्फोटासंबंधीचे काही कायदे आणि तरतुदी आपल्याला माहित असणे आवश्यक आहे.
जर पती-पत्नी कोणत्याही ठोस कारणाशिवाय वेगळे राहत असतील तर एक पक्ष कोर्टात जाऊन दुसऱ्या विरोधात घटस्फोटाची मागणी करू शकते. कोर्टाचा आदेश मान्य केला नाही, तर दोन्ही पक्षांपैकी एक बाजू घटस्फोटाची मागणी करु शकते. परस्पर सहमतीने होणाऱ्या घटस्फोटात या कलमाचे कोणतेही महत्त्व राहत नाही.
यावेळी न्यायालय दोन्ही बाजूच्या संपत्तीचा आढावा घेण्याचा आदेश देतात. हिंदू मॅरेज कायद्यानुसार कलम 25 मध्ये देखभाल खर्च आणि एलिमनीची तरतुद आहे. यात नवरा आणि बायको दोघांना अधिकार दिले आहेत. यात काही अतिदेखील आहेत. स्पेशल मॅरेज कायद्यानुसार, यात फक्त पत्नीलाच पोटगी आणि देखभाल घेण्याचा अधिकार आहे.
घटस्फोटाच्या प्रकरणात बायकोच नाही तर नवराही पोटगीची मागणी करू शकतो. यासाठी गरजेचे आहे ते म्हणजे उत्पन्नाचे साधन नसणे. जर नवऱ्याकडे उत्पन्नाचे साधन नसेल किंवा त्याचे उत्पन्न बायकोपेक्षा कमी असेल तर तो घटस्फोटावेळी पोटगीची मागणी करू शकतो. असे प्रकरण फार कमी पाहायला मिळतात, बहुतेक प्रकरणात नवराच बायकोला देखभाल खर्च देतो.