हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?
जगभरातील सर्व मुस्लिम बांधवांसाठी हजच्या महिन्यात येणारी हज यात्रा महत्वाची आहे. हजचा महिना सुरु झाल्यानंतर या यात्रेला सुरुवात होते. सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरामध्ये हज यात्रा असते. हज यात्रेला दरवर्षी लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव जातात. हज यात्रेला जाण्यापूर्वी नोंदणी करावी लागते. त्यानंतरच हज यात्रेला जात येत. इस्लामिक पुस्तकात सांगितल्यानुसार, प्रत्येक मुल्सिम बांधवाने आयुष्यात एकदा तरी हज यात्रेला जावे. पण तुम्ही अनेकदा पाहिलं असेल हज यात्रेला गेल्यानंतर मुस्लिम बांधव पांढरे कपडे घालतात. पण तुम्हाला यामागे नेमकं काय कारण हे माहित आहे का? नसेल माहित तर जाऊन घ्या.(फोटो सौजन्य-istock)
हज यात्रेत पांढऱ्या रंगाचे कपडे का घालतात?
हज यात्रेला जाताना काही परंपरा आणि काही नियमांचे पालन करावे लागते. त्यातील एक म्हणजे पांढरे कपडे घालणे. या पांढऱ्या कपड्याना इहराम असे म्हणतात. ही हज यात्रेची प्रमुख अट आहे. हज यात्रेला गेल्यानंतर हजारो बांधवाना इहराम परिधान करावा लागतो. इहराम हे संपत्ती, पवित्रता आणि समर्पणाचे प्रतीक मानले जाते. हे सर्व वर्ग, जाती, वंशातील लोकांना समान बनवते. तसेच इस्लाम समानतेवर भर देण्यासाठी आणि पांढऱ्या रंगाचे कापड अल्लाहच्या नजरेत सर्व समान दर्शवण्यासाठी पांढऱ्या रंगाचे कपडे घातले जातात.
हे देखील वाचा: ‘हज यात्रे’साठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
hajj yatra
हज यात्रेला गेल्यानंतर सर्व प्रकारच्या चुका, पाप माफ होतात असे बोलले जाते.मुफ्ती साहेबांच्या सांगण्यानुसार, पांढरे कपडे घालणे म्हणजे तुम्ही देवासमोर येण्यासाठी तयार आहात. पण हज यात्रेमध्ये पुरुषांचं पांढरे कपडे घालणे बंधनकारक आहे. महिला कोणत्या रंगाचे सैल फिट कपडे घालू शकतात. 628 मध्ये पैगंबर मोहम्मद यांनी १४०० अनुयानांना घेऊन प्रवास सुरु केला होता. त्यानंतर त्यांनी केलेला हा प्रवास इस्लामचा पहिला तीर्थयात्रा ठरला होता. त्यालाच पुढे जाऊन हज असे नाव देण्यात आले.