Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुमारी कंदम! समुद्राखाली दडलेल्या एका हरवलेल्या जगाची गोष्ट! फक्त एक पौराणिक कल्पना की विज्ञानाने नाकारलेले ऐतिहासिक सत्य?

कुमारी कंदम हा हिंदी महासागरात बुडालेला एक पौराणिक तामिळ महाद्दिप मानला जातो, जिथे प्राचीन तामिळ संस्कृती बहरली होती. विज्ञानाने एवढा मोठा महाद्दिप नाकारला असला, तरी हिमयुगानंतर समुद्राची पातळी वाढल्याने भारताचा काही किनारी भाग बुडाल्याचे भौगोलिक तथ्य या गोष्टीला बळ देते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 09:02 PM
कुमारी कंदम! समुद्राखाली दडलेल्या एका हरवलेल्या जगाची गोष्ट! फक्त एक पौराणिक कल्पना की विज्ञानाने नाकारलेले ऐतिहासिक सत्य?
Follow Us
Follow Us:

हिंदी महासागरात बुडालेला एक विशाल भूभाग, जिथे तामिळ संस्कृतीचा जन्म झाला आणि जिथून मानवी संस्कृतीची सुरुवात झाली—अशी मान्यता असलेला प्रदेश म्हणजेच ‘कुमारी कंदम’. अटलांटिसप्रमाणेच कुमारी कंदम हे जगातील सर्वात मोठ्या रहस्यांपैकी एक मानले जाते. या काल्पनिक किंवा हरवलेल्या महाद्दिपाचा वेध लोककथा, इतिहास, पुराण आणि भूगर्भशास्त्राच्या नजरेतून घेऊया,

तामिळ लोककथा आणि पौराणिक संदर्भ

तामिळ साहित्यात आणि लोककथांमध्ये कुमारी कंदमचा उल्लेख अतिशय आदराने केला जातो. ‘सिलप्पधिकरम’ आणि ‘मनिमेकलई’ या प्राचीन तामिळ महाकाव्यांमध्ये याचा संदर्भ मिळतो. असे मानले जाते की, हा भूभाग आजच्या भारताच्या दक्षिण टोकापासून, कन्याकुमारी पासून थेट आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला होता. येथे तामिळ राजांचे, पांड्य राजवंशाचे साम्राज्य होते आणि इथेच पहिले दोन तामिळ ‘साहित्यिक संमेलन’ पार पडले होते, ज्यामध्ये हजारो वर्षे जुने ग्रंथ लिहिले गेले. परंतु, समुद्राला आलेल्या महाभयंकर लाटांनी हा संपूर्ण प्रदेश गिळंकृत केला.

आद्य शंकराचार्यांनी प्रतिष्ठापित केलेली ज्ञानाची अधिष्ठात्री देवी, जाणून घ्या इतिहास आणि आध्यात्मिक महत्त्व

इतिहास आणि ‘लेमुरिया‘ची संकल्पना

१९ व्या शतकात जेव्हा पाश्चात्त्य शास्त्रज्ञांनी निसर्गाचा अभ्यास सुरू केला, तेव्हा फिलिप स्क्लेटर या इंग्रज प्राणि शास्त्रज्ञाला भारत आणि आफ्रिकेतील लेमूर या प्राण्यांच्या जीवाश्मांमध्ये कमालीचे साम्य आढळले. एवढ्या मोठ्या महासागराच्या दोन टोकांना एकाच प्रकारचे प्राणी कसे असू शकतात, यावरून त्यांनी तर्क लावला की प्राचीन काळी भारत आणि आफ्रिकेला जोडणारा एक भूभाग असावा, ज्याला त्यांनी ‘लेमुरिया’ नाव दिले. तामिळ विद्वानांनी या लेमुरिया संकल्पनेला आपल्या प्राचीन ‘कुमारी कंदम’च्या कथांशी जोडले.

भूगर्भशास्त्र आणि वैज्ञानिक सत्य

विज्ञान आणि आधुनिक भूगर्भशास्त्र  कुमारी कंदम किंवा लेमुरिया या मोठ्या महाद्दिपाचे अस्तित्व पूर्णपणे नाकारते. ‘प्लेट टेक्टोनिक्स’ या विज्ञानाच्या सिद्धांतानुसार, लाखो वर्षांपूर्वी ‘गोंडवाना’ नावाचा एक महाद्दिप होता, जो तुटून भारत, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया वेगळे झाले. परंतु, हे लाखो वर्षांपूर्वी घडले, जेव्हा जगात मानवच नव्हता. त्यामुळे तिथे तामिळ संस्कृती असणे विज्ञानाला मान्य नाही.

Ramayana: श्रीरामांनी अयोध्येत जाण्यापूर्वी हनुमानालाच भरताकडे का पाठवले? रामायणातील अद्भुत प्रसंग

तथापि, वैज्ञानिक हे मान्य करतात की सुमारे १२,००० वर्षांपूर्वी पृथ्वीवरील शेवटचे हिमयुग संपले, तेव्हा बर्फ वितळल्यामुळे समुद्राची पातळी तब्बल १२० मीटरने वाढली होती. यामुळे भारताचा दक्षिणेकडील काही किनारी भूभाग नक्कीच पाण्याखाली गेला. कदाचित याच महापुराच्या आठवणी पिढ्यानपिढ्या कथांच्या माध्यमातून जिवंत राहिल्या असाव्यात.

लोकांचे काय म्हणणे आहे?

तामिळनाडू आणि दक्षिण भारतात आजही अनेकांची अशी ठाम श्रद्धा आहे की कुमारी कंदम हे केवळ दंतकथा नसून एक ऐतिहासिक सत्य होते. अनेक तज्ज्ञांच्या मते, कन्याकुमारी जवळील समुद्रात खोलवर पुरातत्व उत्खनन केल्यास या प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडू शकतात.

थोडक्यात सांगायचे तर, कुमारी कंदम हा इतिहास, पुराण आणि विज्ञानाचा एक रंजक संगम आहे. विज्ञानासाठी तो हिमयुगानंतर समुद्रात बुडालेला एक छोटा किनारी भाग असू शकतो, तर तामिळ अस्मितेसाठी तो त्यांच्या गौरवशाली आणि प्राचीन इतिहासाचा भाग आहे.

Web Title: Kumari kandam legend of tamilnadu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 09:02 PM

Topics:  

  • Tamilnadu
  • tourism

संबंधित बातम्या

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…
1

Travel News : थायलंडचे अनोखे मंदिर! इथे पूजा नाही तर फोटोशूट करायला जातात लोक…

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत
2

मुंबईच्या क्रूझ पर्यटनाला मिळणार नवी झेप; ५ वर्षांनी दुसरे जहाज दाखल, २३ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही
3

नशीब नाही, ट्रेनमध्ये ‘या’ फॉर्मुल्याने मिळते विंडो सीट! रेल्वेचा हा नियम बहुतेकांना ठाऊकच नाही

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित
4

Travel News : एकट्याने फिरण्याचा विचार करताय? या चुका टाळल्या तर प्रवास होईल सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.