
Lokmanya Tilak's book Shrimadbhavadgitarahasya was published on 08 June dinvishesh
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे लोकमान्य टिळक यांनी अनेकांच्या जीवनावर प्रभाव निर्माण केला. त्यांनी साहित्यनिर्मिती आणि वर्तमानपत्रातून लेखन करुन परखड व स्पष्ट भूमिका मांडली. त्यांचा गीतारहस्य हा अत्यंत चर्चेत राहिलेला ग्रंथ आहे. श्रीमद्भवद्गीतारहस्य अथवा कर्मयोग हा लेखक बाळ गंगाधर टिळक यांचा ग्रंथ आजच्या दिवशी १९१५ साली प्रकाशित झाला होता. भगवद्गीता या मूळ संस्कृत ग्रंथाचा मराठी अनुवाद आणि परीक्षणात्मक टीकाग्रंथ आहे. हा ग्रंथ गीतारहस्य या नावानेच परिचित आहे. या ग्रंथात गीतेचे अंतरंगपरीक्षण तसेच बहिरंगपरीक्षण केले आहे. ह्या ग्रंथाच्या रूपाने मराठी भाषेमध्ये प्रथमच गीतेचे ’बहिरंगपरीक्षण’ केले गेले.