फोटो सौजन्य: सोशल मीडिया
दरवर्षी 17 डिसेंबर रोजी पेन्शनर्स डे संपूर्ण भारताता साजरा केला जातो. ब्रिटीश सरकारने 1857 साली भारतात ही पेन्शन प्रणाली लागू केली होती, ही योजना ब्रिटनच्या पेन्शनप्रणालीवर आधारित होती. पेन्शन म्हणजे एक प्रकारची सेवानिवृत्ती योजना असून, यामध्ये कर्मचारी नोकरीदरम्यान काही रक्कम जमा करतो आणि निवृत्तीनंतर त्याला नियमित पगाराच्या स्वरूपात पैसे मिळतात, म्हणजेच पेन्शन मिळते.
आजही निवृत्तीनंतर अनेक कर्मचारी पेन्शन मिळवण्यासाठी संघर्ष करतात. यामुळे पेन्शनधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि पेन्शन व्यवस्थेला अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्यात येतो. पेन्शन प्रणाली वृद्धावस्थेमध्ये आर्थिक स्थिरता आणि सुरक्षितता देते, यामुळे सेवानिवृत्त व्यक्तींना प्रतिष्ठेने आणि सन्मानाने जीवन जगता येते. पेन्शन योजना व्यतींना वृध्दापकाळात आर्थिक सुरक्षितता आणि स्थिरता प्रदान करते.
‘या’ आहेत भारतातील पेन्शन योजना
भारतीय पेन्शन योजना व्यवस्थेच कर्मचारी भविष्य निधी योजना (EPF), कर्मचारी पेंशन योजना (EPS) आणि राष्ट्रीय पेंशन योजना (NPS) महत्त्वाच्या आहेत. 2004 नंतर केंद्र सरकारच्या सेवेत येणारे कर्मचारी NPS च्या अंतर्गत येतात. EPS च्या लाभासाठी किमान 10 वर्षांचे योगदान आणि 58 वर्षे वय आवश्यक असते.
भारतात वृद्धत्वाची समस्या वाढत आहे. संयुक्त राष्ट्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारताची जीवन प्रतिक्षा 2050 पर्यंत 75 वर्षे होईल. यामुळे निवृत्तीनंतरचे वर्षे वाढत असून पेन्शन योजना अनिवार्य ठरत आहे. मात्र, भारतातील 88% कामगार असंघटित क्षेत्रात काम करतात, जे EPFO च्या कक्षेत येत नाहीत. ही एक मोठी समस्या आहे.
पेंशन व्यवस्थेतील प्रमुख अडचणी म्हणजे –
सध्या पेन्शन व्यवस्थेत काही अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामागची कारणे म्हणजे, वृद्धत्व लोकसंख्या वाढ, असंगठित क्षेत्रातील कामगारांचे दुर्लक्ष, सार्वजनिक वित्तीय तुटीचा दबाव या अडचणींमुळे अनेक लोकांना पेन्शन मिळण्यास अडचण येते. याशिवाय, वाढत्या राहणीमानाचा खर्च, महागाई मुळे देखील अनेक अडचणी निर्माण होत आहेत.
भारत सरकारने EPFO, NPS आणि सार्वजनिक भविष्य निधी योजना कार्यान्वित केल्या आहेत, पण त्यांचा लाभ अजून सर्व श्रेणींतील नागरिकांना पोहोचला नाही. त्यामुळे सरकारने असंघटित क्षेत्रासाठी पेंशन योजनांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित करावे, जेणेकरून देशातील प्रत्येक नागरिकाला वृद्धावस्थेत आर्थिक सुरक्षितता मिळेल. पेंशन योजना ही गरज आहे, जी सन्मानपूर्वक आयुष्य जगण्याचे साधन आहे.