Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : झाशीची राणी लक्ष्मीबाईंना रणांगणातच आले वीरमरण; जाणून घ्या 18 जूनचा इतिहास

मायभूमीसाठी त्यांच्या प्राणाची आहूती देणाऱ्या आणि भारताची स्वाभिमान आणि स्वातंत्र्याची लढाई लढणाऱ्या झाशीची राणी लक्ष्मीबाई यांना ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत वीरमरण आले.

  • By प्रीति माने
Updated On: Jun 18, 2025 | 11:27 AM
Rani Lakshmibai of Jhansi died a heroic death on the battlefield, June 18, History

Rani Lakshmibai of Jhansi died a heroic death on the battlefield, June 18, History

Follow Us
Close
Follow Us:

देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेक महिला क्रांतिकारी होऊन गेल्या ज्यांनी मायभूमीसाठी त्यांच्या प्राणाची आहूती वाहिली. त्या पैकी एक महत्त्वपूर्ण आणि प्रभावशाली व्यक्तीमत्त्व म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई. मणिकर्णिका अर्थात लक्ष्मीबाई यांनी इंग्रजापुढे न झुकता स्वातंत्र आणि स्वाभिमानाचा लढा दिला. झाशीची गादी सांभाळून नेतृत्व करणाऱ्या झाशीची राणी या आजही सर्वांसाठी एक आदर्श आहेत. १६ जून १८५८ रोजी ग्वाल्हेरजवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. आजच्या दिवशी 1858 साली त्यांचा रणांगणातच त्यांना वीरमरण आले.

18 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1776 : महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची प्रसिद्ध लढाई झाली.
  • 1815 : वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव.
  • 1830 : फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतला.
  • 1908 : फिलीपिन्स विद्यापीठाची स्थापना झाली.
  • 1930 : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
  • 1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
  • 1956 : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
  • 1981 : प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाच्या आजाराविरूद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित करण्यात आली.
  • 1983 : अंतराळवीर सॅली राइड अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला बनली.
  • 1987 : एम. एस. स्वामीनाथन यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
  • 2009 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर एक विशेष उपग्रह पाठवला.
  • 2017 : किदम्बी श्रीकांत भारतीय बॅडमिंटनपटूला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

18 जून रोजी जन्म दिनविशेष

  • 1887 : ‘डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा’ – थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा जन्मदिन.
  • 1899 : ‘शंकर त्रिंबक’ तथा ‘दादा धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1985)
  • 1911 : ‘कमला सोहोनी’ – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1997)
  • 1931 : ‘के. एस. सुदर्शन’ – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 15 सप्टेंबर 2012)
  • 1931 : ‘फर्नांडो हेन्रिक कार्डोसो’ – ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
  • 1942 : ‘थाबो म्बेकी’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘पॉल मॅकार्टनी’ – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य यांचा जन्म.
  • 1987 : ‘मोईन अली’ – इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

18 जून रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1858 : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: 19 नोव्हेंबर 1828)
  • 1901 : ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर’ – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1843)
  • 1902 : ‘सॅम्युअल बटलर’ – इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1835)
  • 1936 : ‘मॅक्झिम गॉर्की’ रशियन लेखक यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1868)
  • 1958 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1900)
  • 1962 : जे. आर. तथा ‘नानासाहेब घारपुरे’ – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य यांचे निधन.
  • 1974 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1896)
  • 1999 : ‘श्रीपाद रामकृष्ण काळे’ – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार यांचे निधन.
  • 2003: ‘जानकीदास’ – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते यांचे निधन.
  • 2005 : ‘मुश्ताक अली’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1914)
  • 2009 : ‘उस्ताद अली अकबर खाँ’ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1922)
  • 2020 : ‘लच्छमानसिंग लेहल’ – परम विशिष्ठ सेवा वीर चक्र, मेजर-जनरल, यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1923)
  • 2021 : मिल्खा सिंग – पद्मश्री, द फ्लाइंग शीख, धावपटू, यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)

Web Title: Rani lakshmibai of jhansi died a heroic death on the battlefield june 18 history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 11:27 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास
1

कोल्हापूरच्या नव्या पर्वाची सुरुवात! छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक; जाणून घ्या 02 एप्रिलचा इतिहास

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्नाने सन्मान; जाणून घ्या 1 एप्रिलचा ऐतिहासिक दिवस
2

घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा भारतरत्नाने सन्मान; जाणून घ्या 1 एप्रिलचा ऐतिहासिक दिवस

Dr. Anandibai Joshi : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी जयंती; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास
3

Dr. Anandibai Joshi : भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी जयंती; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास

स्वातंत्र्यसाठी प्राणांची आहुती देणारे मुरारजी देशपांडे पुण्यतिथी; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास
4

स्वातंत्र्यसाठी प्राणांची आहुती देणारे मुरारजी देशपांडे पुण्यतिथी; जाणून घ्या 30 मार्चचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.