Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय चित्रपटसृष्टीला जागतिक स्तरावर पोहोचवणाऱ्या महामेरु Satyajit Ray यांची जयंती; जाणून घ्या ०२ मे चा इतिहास

Satyajit Ray Birth Anniversary : आज भारतीय चित्रपत्रटसृष्टीचे जनक आणि भारतरत्न सत्यजित रे यांची जयंती आहे. त्यांनी पथेर पांचाली आणि अपू पात्र यांसारख्या उत्कृष्ट कलाकृतींद्वारे भारतीय चित्रपटसृष्टीत क्रांती घडवून आणली.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 08:54 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Close
Follow Us:

आज भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक  सत्यजित रे यांची जयंती आहे. त्यांनी आपल्या वास्तववादी दृष्टीकोनातून भारतीय सिनेमाला जागतिक स्तरावर पोहोचवले आहे. मानवी संवेदना आणि वास्तवावदाचा सुरेख संगम साधत रे यांनी पथेर पांचाली अपराजितो, आणि देवी यांसारख्या कलाकृती साकारल्या आहेत. या कलाकृतीने भारतीय सिनेमा आज जगभरात पोहोचला आहे. त्यांनी केवळ दिग्दर्शनच नव्हे, तर ते एक लेखक, संगीतकार आणि चित्रकारही होते. त्यांनी लहान मुलांसाठी देखील संदेश या मासिकाचे लिखाण केले आहे. याशिवाय बंगाली साहित्यात त्यांनी फेलूदा आणि प्रोफेसर शोंकू यांसारख्या अजरामर पात्र आजही लोकप्रिय आहे. त्यांना भारतरत्न आणि ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

02 मे रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1908 : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लंडनमध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी केली.
1918 : जनरल मोटर्सने शेवरलेट मोटर कंपनी विकत घेतली.
1921 : स्वातंत्र्यवीर सावरकरांचे बंधू बाबाराव आणि तात्याराव यांना अंदमानातून हिंदुस्थानात पाठवण्यात आले.
1994 : बँक ऑफ कराडचे बँक ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण.
1994 : नगर जिल्ह्यातील रामदास ढमाले या अपंग युवकाने पुण्यातील टिळक तलावात सलग 37 तास 45 मिनिटे पोहण्याचा विक्रम केला.
1997 : टोनी ब्लेअर इंग्लंडचे पंतप्रधान झाले.
1997 : पुण्याच्या अभिजित कुंटेने राष्ट्रीय अ बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मास्टर विजेतेपदाचे निकष पूर्ण केले.
1999 : कोल्हापूर येथील शर्वरी मानसिंग पवार या तीन वर्षे चार महिन्याच्या बालिकेने 51.1 कि. मी. अंतर न थांबता स्केटिंग करुन 3 तास 51 मिनिटांत पार केले.
1999 : मीरा मॉस्कोसो पनामाच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनल्या.
2004 : एस. राजेंद्र बाबू यांनी भारताचे 34 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
2011 : ओसामा बिन लादेनला पाकिस्तानातील अबोटाबाद येथे नेव्ही सील 6 ने ठार मारले.
2012 : नॉर्वेजियन चित्रकार एडवर्ड मुंच यांचे द स्क्रीम हे चित्र लिलावात $120 दशलक्षमध्ये विकले गेले. हा नवा विश्वविक्रम ठरला.

International Workers Day : ‘मेहनत हीच खरी इश्वरपूजा!’ जाणून घ्या आंतरराष्ट्रीय कामगार दिनाचा रंजक इतिहास आणि जागतिक महत्त्व

02 मे रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1899 : ‘भालजी पेंढारकर’ – मराठी चित्रपटसृष्टी चे चित्रमहर्षी यांचा जन्म. (मृत्यू: 26 नोव्हेंबर 1994)
1920 : ‘डॉ. वसंतराव देशपांडे’ – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 30 जुलै 1983)
1921 : ‘सत्यजित रे’ – ख्यातनाम चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आणि भारतरत्‍न तसेच विशेष ऑस्कर पुरस्कार विजेते यांचा जन्म. (मृत्यू: 23 एप्रिल 1992)
1929 : ‘जिग्मे दोरजी वांगचुकयांचा’ – भूतानचे राजे जन्म. (मृत्यू: 21 जुलै 1972)
1969 : ‘ब्रायन लारा’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू यांचा जन्म.
1972 : ‘अहटी हेनला’ – स्काईप सॉफ्टवेअर चे सहनिर्माते यांचा जन्म.

02 मे रोजी मृत्यू दिनविशेष

1519 : ‘लिओनार्डो दा विंची’ – इटालियन चित्रकार, संशोधक, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 15 एप्रिल 1452)
1683 : ‘रघुनाथ नारायण हणमंते’ तथा रघुनाथपंडित शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरुन राज्यव्यवहारकोश तयार करणारे मुत्सद्दी यांचे निधन.
1963 : ‘डॉ. के. बी. लेले’ – महाराष्ट्रातील जादूगारांचे आचार्य यांचे निधन. (जन्म: 2 नोव्हेंबर 1882)
1973 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचे निधन. (जन्म: 8 जून 1910)
1975 : ‘शांताराम आठवले’ – चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार यांचे निधन. (जन्म: 21 जानेवारी 1910)
1998 : ‘पुरुषोत्तम काकोडकर’ – गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते, ५व्या लोकसभेचे सदस्य यांचे निधन. (जन्म: 18 मे 1913)
1999 : ‘पं. सुधाकरबुवा डिग्रजकर’ – जयपूर-अत्रौली घराण्याचे शास्त्रीय गायक यांचे निधन.
2011 : अल कायदा चे संस्थापक ओसामा बिन लादेन ला अमेरिकन सैन्याने ठार मारले. (जन्म: 10 मार्च 1957)

World Tuna Day : जागतिक खाद्यसंस्कृतीचा राजा, पण संवर्धनाविना अस्तित्व धोक्यात; वाचा ‘या’ खास माश्याबद्दल रंजक माहिती

Web Title: Satyajit ray birth anniversary know the history of 02 may marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास
1

भारतीय क्रिकेटचा हिटमॅन रोहिम शर्माचा 39वा वाढदिवस; जाणून घ्या ३० एप्रिलचा इतिहास

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास
2

अभिनयाचा शहेनशहा Irrfan Khan चा स्मृतिदिन; जाणून घ्या २९ एप्रिलचा इतिहास

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास
3

मराठा साम्राज्याचे श्रीमंत बाजीराव बल्लाळ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या २८ एप्रिलचा इतिहास

हरहुन्नरी अभिनेते अन् बहुआयामी व्यक्तिमत्त्व विनोद खन्ना यांनी घेतला जगाचा निरोप; 27 एप्रिलचा इतिहास
4

हरहुन्नरी अभिनेते अन् बहुआयामी व्यक्तिमत्त्व विनोद खन्ना यांनी घेतला जगाचा निरोप; 27 एप्रिलचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.