
Dinvishesh
Rohit Sharma Birthday : आज भारतीय क्रिकेटमधील उत्कृष्ट कर्णधार आणि स्फोटक फलंदाज म्हणजे रोहित शर्मा, ज्याला हिटमॅन म्हणूनही ओळखले जाते. आज आपला हिटमॅन 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. शांत डोके आणि आक्रमक फलंदाजी ही त्याची खरी ओळख. रोहिम मैदानावर ये असतानाचा चाहते सुटकेचा श्वास सोडतात, कारण त्यांचा हिटमॅन मैदानावर म्हणजे विजय निश्चितच हे त्यांना माहित असते. त्याच्या बॅटीतून गगनचुंबी सिक्सर्सच निघतात. वैयक्तिक विक्रमापेक्षा रोहिमने नेहमीच संघाच्या विजयाला महत्त्व दिले आहेत. टीका आणि दुखापतींवर मात करत हा मुंबईचा मुलगा संपूर्ण भारताचा चाहता बनला आहे.
30 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1492 : स्पेनने ख्रिस्तोफर कोलंबस यांना त्यांच्या शोधाकार्यासाठी नियुक्त केले.
1657 : शिवाजी महाराजांनी मुघलांच्या ताब्यात असलेल्या जुन्नर शहरावर हल्ला करून लुटले.
1789 : जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे पहिले निर्वाचित राष्ट्राध्यक्ष बनले.
1905 : अल्बर्ट आइनस्टाईन यांनी झुरिच विद्यापीठात डॉक्टरेट प्रबंध पूर्ण केला.
1936 : महात्मा गांधींनी वर्ध्याजवळ सेवाग्राम आश्रम स्थापन केला.
1977 : 9 राज्यांमधील विधानसभा विसर्जित करण्यात आली आणि जनसंघ, समाजवादी पक्ष, केंद्रीय काँग्रेस आणि भारतीय लोक दल यांनी जनता पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
1982 : कलकत्ता येथे बिजन सेतू हत्याकांड घडले.
1995 : बिल क्लिंटन उत्तर आयर्लंडला भेट देणारे पहिले अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बनले.
1996 : थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिराच्या प्रांगणात श्रीमंत माधवराव पेशव्यांच्या स्मृतिस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.
2009 : ख्रायस्लर कंपनीने दिवाळखोरी घोषित केली.
2013 : विलेम-अलेक्झांडर नेदरलँड्सचा राजा बनल्यानंतर त्याची आई राणी बीट्रिक्सने राजीनामा दिला; ती 33 वर्षांपूर्वी सिंहासनावर आरूढ झाली होती.
April 29 : कला आणि करुणेचा अनोखा संगम! जाणून घ्या आज ‘या’ दोन खास दिवसांचे महत्च अन् रंजक इतिहास
30 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
1777 : ‘कार्ल फ्रेड्रिक गाऊस’ – जर्मन गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 23 फेब्रुवारी 1855)
1870 : ‘दादासाहेब फाळके’ – भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 फेब्रुवारी 1944)
1909 : माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्ट्रसंत तुकडोजी महाराज – यांचा जन्म. (मृत्यू: 11 ऑक्टोबर 1968)
1910 : श्रीरंगम श्रीनिवास राव ऊर्फ ‘श्री श्री राव’ – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते तेलुगू कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 15 जून 1983)
1921 : ‘रॉजर एल. ईस्टन’ – जीपीएस चे सहसंशोधक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मे 2014)
1926 : ‘श्रीनिवास खळे’ – मराठी संगीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 2 सप्टेंबर 2011)
1987 : ‘रोहित शर्मा’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
30 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष
1030 : ‘मोहंमद गझनी’ – तुर्कीच्या गझनवी साम्राज्याचा शासक यांचे निधन. (जन्म: 2 ऑक्टोबर 971)
1878 : साक्षात्कारी सत्पुरुष व दत्तावतारी स्वामीमहाराज अक्कलकोट यांनी समाधी घेतली.
1913 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार आणि निबंधकार यांचे निधन. (जन्म: 7 नोव्हेंबर 1868)
1945 : ‘अॅडॉल्फ हिटलर’ – जर्मनीचे नाझी हुकूमशहा यांनी आत्महत्या केली. (जन्म: 20 एप्रिल 1889)
2001 : ‘श्रीपाद अच्युत दाभोळकर’ – प्रयोग परिवार या संकल्पनेचे प्रवर्तक, गणितज्ञ आणि कृषी शास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म: 21 ऑगस्ट 1924)
2003 : ‘वसंत पोतदार’ – मराठी साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 20 नोव्हेंबर 1939)
2014 : ‘खालिद चौधरी’ – भारतीय चित्रकार आणि सेट डिझायनर यांचे निधन. (जन्म: 20 डिसेंबर 1919)
2020 : ‘ऋषि कपूर’ – चित्रपट अभिनेता यांचे निधन.