Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत ऋतू म्हणजे हवामानाचा ‘आरसा’; निसर्गातील बदल टिपण्याची पूर्वपार परंपरा

वसंत हा केवळ ऋतू नसून, येणाऱ्या हवामानाचा ‘आरसा’ मानला जातो. या काळातील निसर्गातील बदल पुढील उन्हाळा आणि पावसाळ्याचे संकेत देतात, अशी पूर्वापार धारणा आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 14, 2026 | 05:09 PM
Spring is not only season but reliable gauge weather predication Intensity of Sunlight and Rainfall Levels

Spring is not only season but reliable gauge weather predication Intensity of Sunlight and Rainfall Levels

Follow Us
Close
Follow Us:

सुनयना सोनवणे : पुणे : सध्या वसंत ऋतू सुरू असून हिवाळा आणि उन्हाळा यांच्या संक्रमणातील हा काळ निसर्गातील सूक्ष्म बदलांचा वेध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आधुनिक उपग्रह, रडार आणि संगणकीय मॉडेल्समुळे हवामानाचा अंदाज आज अधिक अचूक होत असला, तरी वसंत ऋतूतील निसर्ग निरीक्षणावर आधारित पारंपरिक ज्ञानाचे महत्त्व अजूनही कायम आहे. वसंत हा केवळ ऋतू नसून, येणाऱ्या हवामानाचा ‘आरसा’ मानला जातो. या काळातील निसर्गातील बदल पुढील उन्हाळा आणि पावसाळ्याचे संकेत देतात, अशी पूर्वापार धारणा आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात शेतकरी आणि जाणकार मंडळी वसंतातील तापमानातील चढ-उतार, वाऱ्याची दिशा आणि आकाशातील बदल यावरून हवामानाचा अंदाज बांधत असत. सकाळचा गारवा आणि दुपारची वाढती उष्णता यामधील संतुलन पाहून उन्हाळ्याची तीव्रता ठरवली जाई. वसंतात उष्णता लवकर वाढल्यास कडक उन्हाळ्याचे संकेत मानले जात, तर गारवा टिकून राहिल्यास उन्हाळा तुलनेने सौम्य राहील, असे भाकीत केले जाई.

तज्ञांच्या मते, वसंत ऋतू हा केवळ तापमानातील बदलांचा काळ नसून, निसर्गातील विविध घटकांच्या वर्तनातूनही हवामानाचे संकेत देणारा असतो. सूर्यास्तावेळी आकाश लालसर दिसल्यास पावसाची शक्यता व्यक्त केली जाई; तर चंद्राभोवती वलय दिसल्यास काही दिवसांत पावसाचे आगमन होईल, असा समज होता. ताऱ्यांची स्पष्टता आणि ढगांची हालचाल यावरूनही पुढील हवामानाचा वेध घेतला जाई.

हे देखील वाचा : शहरात जाण्यासाठी पैसै चोरणारा भिवा ते अर्थतज्ज्ञ डॉ.बाबासाहेब आंबेडकर; महामानवाच्या संघर्षमय गाथा

सजीवांच्या हालचालींमधूनही वसंत ऋतूत हवामानाचे संकेत स्पष्ट दिसतात. मुंग्या अंडी वर नेत असल्यास पावसाची चाहूल, पक्षी खाली उडू लागल्यास हवेत वाढलेला ओलावा, तर बेडकांच्या आवाजात वाढ होणे हे पावसाच्या आगमनाचे लक्षण मानले जात असे. जनावरांची अस्वस्थता ही वादळ किंवा अचानक बदलणाऱ्या हवामानाची पूर्वसूचना समजली जाई.

तज्ञांच्या मते, वनस्पतींच्या निरीक्षणातही वसंताचे विशेष स्थान आहे. आंब्याचा बहर, कडुलिंबाचा फुलोरा आणि गव्हाची स्थिती यावरून पावसाळ्याचा अंदाज व्यक्त केला जाई. आंब्याचा बहर चांगला असल्यास संतुलित पावसाळ्याची अपेक्षा, तर फुलगळ झाल्यास हवामान अस्थिर राहण्याची शक्यता वर्तवली जाई. गवताची वाढ आणि मातीतील ओलावा यावरूनही पर्जन्यमानाचा अंदाज घेतला जाई. त्यामुळे वसंतावर आधारित अंदाज हे केवळ हवामानापुरते मर्यादित नसून कृषी व्यवस्थापनाशी जोडलेले होते. वसंत ऋतू हा पिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आणि निसर्गातील बदलांचा सर्वात संवेदनशील टप्पा असतो.

हे देखील वाचा : ऐतिहासिक सुवर्णक्षण! जेव्हा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाथांच्या पैठणला आले होते; ७५ वर्षांपूर्वीच्या आठवणींना उजाळा

हवामान अभ्यासक प्रा. डॉ. अनिल राऊत म्हणाले की, ‘पारंपरिक हवामान अंदाज पद्धती या दीर्घकालीन निरीक्षणांवर आधारित होत्या. आजच्या वैज्ञानिक पद्धतींमध्ये डेटा आणि मॉडेल्सचा वापर होतो. मात्र ग्रामीण भागातील लोकांनी केलेली निसर्गाची अचूक नोंद ही त्या काळातील ‘डेटा संकलन’च होती. अनेकदा या अंदाजांमध्ये स्थानिक पातळीवर चांगली अचूकता दिसून येते.’

वसंत ऋतूबाबत पर्यावरण अभ्यासक शुभदा पवार म्हणाल्या की, ‘निसर्गातील सजीवांचे वर्तन हे सूक्ष्म बदलांची जाणीव करून देते. पक्ष्यांचे उडण्याचे स्वरूप, कीटकांची हालचाल किंवा वनस्पतींची प्रतिक्रिया ही हवामानातील बदलांची नैसर्गिक ‘अर्ली वॉर्निंग सिस्टिम’ होती. आजही या संकेतांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.’

वसंत ऋतू : हवामानशास्त्रीय आणि खगोलशास्त्रीय दृष्टिकोन

हवामानशास्त्रीय वसंत ऋतू दरवर्षी १ मार्च ते ३१ मे या कालावधीत निश्चित असतो. मार्च, एप्रिल आणि मे हे महिने या ऋतूचे मानले जातात. तापमानाच्या वार्षिक चक्रावर आधारित असल्यामुळे या तारखा स्थिर राहतात आणि हवामानाची आकडेवारी संकलित करणे सुलभ होते. याउलट, खगोलशास्त्रीय वसंत ऋतू पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या स्थितीवर आधारित असतो. वसंत संपात (इक्विनॉक्स) हा त्याचा प्रारंभ मानला जातो, जो यावर्षी १९ मार्च रोजी पासून सुरू झाला. खगोलशास्त्रीय ऋतूंचा कालावधी साधारण ८९ ते ९३ दिवसांचा असतो आणि तो दरवर्षी बदलतो.

Web Title: Spring is not only season but reliable gauge weather predication intensity of sunlight and rainfall levels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 05:08 PM

Topics:  

  • summer heat
  • weather department
  • Weather forecast

संबंधित बातम्या

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात
1

ओतूर परिसरात विहिरींनी गाठला तळ; उन्हाळ्यामुळे भीषण पाणीटंचाई, टोमॅटो-मिरची पिके संकटात

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा
2

पिढ्यानपिढ्या चालत आलेली भारतातील पारंपरिक पेय उन्हाळ्यात शरीरासाठी ठरतील वरदान, शरीराला मिळेल थंडावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.