Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navarashtra Special: ‘फुटबॉल लिली’ने बहरला विद्यापीठ परिसर; आकर्षक बहराने खुलले निसर्गसौंदर्य

वनस्पतीशास्त्रात स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ॲमरिलिडेसी कुळातील आहे. मूळची उष्णकटिबंधीय आफ्रिका आणि अरबी प्रदेशातील असलेली ही कंदवनस्पती वर्षातून साधारण एकदाच फुलते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 02, 2026 | 02:35 AM
Navarashtra Special: ‘फुटबॉल लिली’ने बहरला विद्यापीठ परिसर; आकर्षक बहराने खुलले निसर्गसौंदर्य
Follow Us
Follow Us:

फुटबॉल लिलीने बहरला पुणे विद्यापीठ परिसर
छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींचे लक्ष या अनोख्या फुलांनी वेधून घेतले
लिली किंवा ब्लड लिली या शोभिवंत वनस्पतीची फुले बहरली

सुनयना सोनवणे /पुणे: फुटबॉलच्या आकाराचा लालभडक फुलांचा गोल देठावर डोलताना दिसला की पावले आपोआप थबकतात. शहरातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात सध्या फुटबॉल लिली अर्थात ब्लड लिलीच्या आकर्षक बहराने निसर्गसौंदर्य खुलले असून विद्यार्थी, छायाचित्रकार आणि निसर्गप्रेमींचे लक्ष या अनोख्या फुलांनी वेधून घेतले आहे.

विद्यापीठ परिसरातील विविध भागांत सध्या फुटबॉल लिली किंवा ब्लड लिली या शोभिवंत वनस्पतीची फुले बहरली आहेत. चमकदार लाल रंगाच्या शेकडो छोट्या फुलांनी बनलेला गोलाकार गुच्छ फुटबॉलसारखा दिसत असल्याने या वनस्पतीला ‘फुटबॉल लिली’ असे नाव पडले आहे. तिचा आकर्षक आकार आणि उठावदार रंग पाहणाऱ्यांचे सहज लक्ष वेधून घेतात.

वनस्पतीशास्त्रात स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ॲमरिलिडेसी कुळातील आहे. मूळची उष्णकटिबंधीय आफ्रिका आणि अरबी प्रदेशातील असलेली ही कंदवनस्पती वर्षातून साधारण एकदाच फुलते. मे महिन्याच्या सुमारास उमलणाऱ्या तिच्या भव्य पुष्पगुच्छामुळे तिला अनेक ठिकाणी ‘मे फ्लॉवर’ असेही संबोधले जाते.

पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ, विद्यार्थ्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा

या वनस्पतीच्या एका देठाच्या टोकावर १०० ते २०० पर्यंत ताऱ्यासारखी लालसर-केशरी फुले एकत्र येऊन गोलाकार छत्रीसदृश गुच्छ तयार करतात. साधारण ८ ते १२ सेंटीमीटर व्यासाचा हा पुष्पगुच्छ दूरवरूनही सहज नजरेत भरतो. प्रत्येक वनस्पतीला एका हंगामात केवळ एकच पुष्पगुच्छ येत असल्याने त्याचा बहर अधिक वैशिष्ट्यपूर्ण मानला जातो. फुटबॉल लिली ही शोभेच्या बागांसाठी लोकप्रिय वनस्पती असून पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक माती, मध्यम प्रमाणात पाणी आणि पुरेसा सूर्यप्रकाश यामध्ये ती उत्तम वाढते. त्यामुळे घरगुती बाग, बाल्कनी तसेच कुंड्यांमध्येही तिची लागवड केली जाते. सध्या विद्यापीठ परिसरात बहरलेल्या या लालभडक फुलांनी परिसराचे सौंदर्य अधिक खुलविले असून, येथील हिरवाईत या फुलांचा उठावदार रंग विशेष आकर्षण निर्माण करत आहे.

SPPU Budget 2026 : पुणे विद्यापीठाचा अर्थसंकल्प सादर; यंदाही 83 कोटींची तुटी, विद्यार्थ्यांना काय मिळाले?

फुटबॉल लिलीची वैशिष्ट्ये 
सामान्य नावे – ब्लड लिली, फुटबॉल लिली, पावडर पफ लिली
शास्त्रीय नाव – स्कॅडॉक्सस मल्टीफ्लोरस
कुळ – ॲमरिलिडेसी
मूळ अधिवास – उष्णकटिबंधीय आफ्रिका
फुलण्याचा कालावधी – मे ते जून (वर्षातून केवळ एकदा)

Web Title: The pune university campus blooms with football lilies flower pune navarashtra specia

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • navarashtra special
  • pune news
  • Pune University

संबंधित बातम्या

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण
1

गणेशोत्सव नियम पाळून साजरा करा; आशिष शेलारांची पुण्यातून विरोधकांवर टीका, UPI शुल्कावरही स्पष्टीकरण

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्
2

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ पुन्हा थरार! ट्रकचे ब्रेक फेल अन्

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड
3

Q Sports League 2026: शेवटच्या क्षणापर्यंत रंगली झुंज! जयराज ब्लास्टर्ससह ‘या’ चार संघांची विजयी घौडदौड

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’
4

Ganesotsav: ध्वनिक्षेपक अन् डीजेच्या वादावर आशिष शेलारांचे आवाहन; म्हणाले, ‘कोणालाही त्रास…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.