Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 मध्ये नवा ‘ट्विस्ट’! आता 10 ओव्हरनंतर चेंडू बदलला जाणार; ‘या’ नव्या नियमामुळे फलंदाज की गोलंदाज, कोणाला होणार फायदा?

आयपीएलच्या (IPL 2026) नवीन हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. मैदानात दोन संघ आमनेसामने येण्यापूर्वीच बीसीसीआयने (BCCI) खेळाच्या नियमांमध्ये एक मोठा आणि अत्यंत रोचक बदल केला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 24, 2026 | 06:58 PM
IPL 2026 मध्ये नवा 'ट्विस्ट'! आता 10 ओव्हरनंतर चेंडू बदलला जाणार (Photo Credit- X)

IPL 2026 मध्ये नवा 'ट्विस्ट'! आता 10 ओव्हरनंतर चेंडू बदलला जाणार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • IPL 2026 मध्ये नवा ‘ट्विस्ट’!
  • आता 10 ओव्हरनंतर चेंडू बदलला जाणार
  • ‘या’ नव्या नियमामुळे फलंदाज की गोलंदाज, कोणाला होणार फायदा?
IPL New Rules 2026: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असलेल्या आयपीएलच्या (IPL 2026) नवीन हंगामाला 28 मार्चपासून सुरुवात होत आहे. मैदानात दोन संघ आमनेसामने येण्यापूर्वीच बीसीसीआयने (BCCI) खेळाच्या नियमांमध्ये एक मोठा आणि अत्यंत रोचक बदल केला आहे. विशेषतः सामन्याच्या दुसऱ्या डावात 10 षटकांनंतर चेंडू बदलण्याबाबतचा हा नियम सामन्याचा निकाल बदलणारा ठरू शकतो. हा नवीन नियम नेमका काय आहे आणि त्याचा खेळावर काय परिणाम होईल, हे सविस्तर समजून घेऊया.

काय आहे नियम?

सामन्यादरम्यान फलंदाजाचा फटका इतका जोरात असतो की चेंडू स्टेडियमबाहेर जातो किंवा अशा ठिकाणी अडकतो जिथून तो परत आणणे शक्य नसते. अशा परिस्थितीत चेंडू बदलण्याबाबत बीसीसीआयने स्पष्ट मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.

  • पंच घेणार अंतिम निर्णय: जर चेंडू हरवला किंवा खेळण्यायोग्य नसेल, तर पंच तो बदलण्याचा निर्णय घेतील.
  • समान झीज असलेला चेंडू: नियमानुसार, जो चेंडू बदलला जाईल, तो आधीच्या चेंडू इतकाच जुना किंवा झीज झालेला असावा लागतो.
  • पारदर्शकता: चेंडू बदलल्यानंतर पंच त्याबाबत फलंदाज, गोलंदाजी करणाऱ्या संघाचा कर्णधार आणि क्षेत्ररक्षकांना पूर्ण माहिती देतील.

ईडनच्या मैदानात रहाणेच ‘अजिंक्य’! 20 चेंडूत दिसला ‘रुद्रावतार’; ठोकले वादळी अर्धशतक, पहा Video

दुसऱ्या डावातील 10 षटकांचा ‘मास्टर प्लॅन’

यावेळच्या आयपीएलमध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती म्हणजे ‘दुसऱ्या डावातील चेंडू बदलाच्या’ नियमाची. हा नियम सामन्यात नवीन थरार निर्माण करेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

  • केवळ दुसऱ्या डावासाठी: हा नियम केवळ सामन्याच्या दुसऱ्या डावात (Second Innings) गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी लागू असेल.
  • 10 षटकांची मर्यादा: गोलंदाजी करणारा संघ 10 षटके पूर्ण झाल्यानंतर कधीही चेंडू बदलण्याची मागणी पंचांकडे करू शकतो. मात्र, ही संधी संपूर्ण डावात केवळ एकदाच मिळेल.
  • वेळेचे बंधन: हा नियम केवळ रात्रीच्या सामन्यांसाठी (संध्याकाळी 07.30वाजता सुरू होणारे) लागू असेल. दुपारी 03.30 वाजता सुरू होणाऱ्या सामन्यात चेंडू बदलता येणार नाही.
  • ओव्हरच्या मध्यात बदल नाही: चेंडू केवळ ओव्हर संपल्यानंतरच बदलला जाईल. चालू ओव्हरमध्ये चेंडू बदलण्याची परवानगी नसेल.

गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा काय बदलले?

गेल्या हंगामातही दव (Dew) असल्यामुळे चेंडू ओला झाल्यास तो बदलण्याची तरतूद होती. पण यंदा बीसीसीआयने यात एक ‘पेच’ टाकला आहे जो गोलंदाजांसाठी फायद्याचा ठरू शकतो. यंदाच्या नियमानुसार, जर गोलंदाजी करणाऱ्या संघाने 10 षटकांनंतर चेंडू बदलण्याची मागणी केली, तर मैदानावर दव असो वा नसो, चेंडू अनिवार्यपणे बदलावाच लागेल. रात्रीच्या सामन्यात दव पडल्यामुळे चेंडू ओला आणि मऊ होतो, ज्यामुळे गोलंदाजांची पकड सुटते आणि फलंदाजी सोपी होते. हा अन्याय टाळण्यासाठी बीसीसीआयने 10 षटकांनंतर सुका आणि समान झीज झालेला चेंडू उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणाला होणार फायदा?

हा नियम लागू झाल्यामुळे फिरकीपटू (Spinners) आणि डेथ ओव्हरमधील वेगवान गोलंदाजांना अधिक मदत मिळण्याची शक्यता आहे. कारण 10 षटकांनंतर नवीन किंवा सुका चेंडू मिळाल्यास त्यांना अधिक चांगली ग्रीप मिळेल आणि रिव्हर्स स्विंग किंवा टर्न मिळवणे सोपे जाईल.

IPL 2026 : KKR आणि SRH ने दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी या दोन दमदार गोलंदाजांना दिली संधी, या खेळाडूंचं उजळणार नशीब

Web Title: A new twist in ipl 2026 the ball will now be changed after 10 overs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 06:58 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL
  • IPL 2026
  • Sports News

संबंधित बातम्या

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात
1

Sports News: धावपटूंचा जोश, जिंकण्याची जिद्द! पुणे विद्यापीठाची क्रॉस-कंट्री स्पर्धा उत्साहात

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
2

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले
3

Maharashtra Today’s Live News in Marathi: आशियाई खेळात भारताने नेमबाजीत दुसरे सुवर्णपदक जिंकले

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय
4

DSP Cricket League: ४८ बॉल अन् ११ फोर! पवन आनंदच्या फटकेबाजीने साई सत्यमचा ‘गोल्डन’ विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.