मुंबई : जगातील सर्वात लोकप्रियअसणाऱ्या फुटबॉल खेळाची जगातील सर्वात मोठी फिफा विश्वचषक स्पर्धा सध्या कतार मध्ये खेळवली जात आहे. फुटबॉल खेळाचे असंख्य चाहते असून विश्वचषकातील रोमांचक सामने पाहण्यासाठी हजारो प्रेक्षक कतारला भेट देत आहेत. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान (Amir Khan) याने आपली विभक्त पत्नी किरण राव आणि मुलासोबत फिफा विश्वचषकातील फुटबॉल सामने पाहण्यासाठी आला होता.
स्टेडियममध्ये चाहत्यासोबत सेल्फी काढत असलेल्या अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. वरवर पाहता आमिर खान फुटबॉलचा प्रचंड उत्साही आहे आणि लिओनेल मेस्सीचाही चाहता आहे. काहीच दिवसांपूर्वी आमिर खानच्या पहिल्या विभक्त पत्नीची मुलगी इरा खान हीचा साखरपुडा पारपडला. त्यानंतर मुलां सोबत काहीवेळ घालवण्यासाठी आमिर खान कतारला गेला आहे. आमिर खानचे फिफा विश्वचषकातील हे फोटो सोशल मीडियावर वायरल होत आहे.