
Tilak Varma Registers Most Catches Record
क्राइस्टचर्च येथे झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात, तिलक वर्माने न्यूझीलंडच्या डावाच्या पहिल्या तीन षटकांत दोन उत्कृष्ट कॅच पकडले. त्याने दुसऱ्या षटकात टिम सेफर्टला आणि त्यानंतर तिसऱ्या षटकात डॅरिल मिचेलला कॅच पकडूनत त्यांना बाद केले. यासह, तो एका कॅलेंडर वर्षात फिल्डर म्हणून टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक कॅच पकडणारा खेळाडू ठरला. २०२६ मध्ये फिल्डर म्हणून सर्वाधिक २६ कॅच पकडण्याचा विक्रम तिलकने केला आहे. त्याने इंडोनेशियाच्या डॅनियलसन हावोचा विक्रम मोडला. त्याने मागील वर्षी, २०२५ मध्ये २५ कॅच पकडले होते घेतले. दरम्यान, युएईच्या मोहम्मद वसीमने २०२४ मध्ये २४ कॅच पकडले.
१८१ धावांचे लक्ष्य गाठताना भारताची सुरुवात संथ झाली. मात्र, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी डावाला गती देण्याचा प्रयत्न केला. पाचव्या षटकात सॅमसन बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाजी डगमगली. वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही महत्त्वपूर्ण योगदान देता आले नाही. भारताने अवघ्या ७० धावांत पाच विकेट्स गमावले.
अशा कठीण परिस्थितीत उपकर्णधार तिलक वर्माने सूत्रे हाती घेतली. तिलकने २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. तर, नितीशनेही २६ धावांचे योगदान दिले. दोघांनी भारताला विजय मिळवून दिला. टीम इंडियाने अवघ्या १९.५ षटकांत ६ विकेटस गमावून १८१ धावा करत सामना जिंकला.