
IND Vs NZ 2nd T20
१८१ धावांचा पाठलाग करताना, टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक होती. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी नेहमीप्रमाणे डावाची सुरुवात केली. सॅमसन फक्त १४ धावा करुन तंबूत परतला. जेकब डफीने सॅमसनने बाद केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या वैभव सूर्यवंशीला नॅथन स्मिथने माघारी पाठवले. वैभव अवघ्या ८ चेंडूमध्ये ४ धावा करुन बाद झाला. अभिषेक शर्माच्या रूपाने भारतीय संघाला दुसरा धक्का बसला. कर्णधार मिचेल सँटनरच्या फिरकी गोलंदाजीवर अभिषेक झेलबाद झाला. अभिषेकने २१ चेंडूंमध्ये ३ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने २७ धावांचे योगदान दिले. सँटनर इथेच थांबला नाही. त्याने श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांना एकाच षटकात बाद करून भारताची धावसंख्या ७०/५ अशी केली.
नमन धीरने काही मोठे फटके मारून भारताच्या आशा जिंवत ठेवल्या, पण तोही मिचेल सँटनरच्या जाळ्यात अडकला. नमनने १७ चेंडूंमध्ये ३१ धावा केल्या. यामध्ये ३ षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. ११२ धावांवर सहावी विकेट पडल्यानंतर, नितीश कुमार रेड्डी तिलक वर्मासोबत फलंदाजीसाठी आला. दोघांनी सुरुवातीला सावधपणे फलंदाजी केली आणि नंतर वेग वाढवला.
तिलक वर्माने नितीश कुमार रेड्डीसोबत मिळून सामन्याचे चित्र पालटले. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ३० चेंडूंमध्ये नाबाद ६९ धावा जोडल्या. तिलकने सहा चौकार आणि एका षटकारासह २६ चेंडूंमध्ये नाबाद ५१ धावा केल्या. नितीशने २०० च्या स्ट्राईक रेटने नाबाद २६ धावा ठोकल्या. किवी कर्णधार सँटनेरने ४ षटकांत २१ धावा देऊन ४ विकेट्स घेतल्या. तर जेकब डफीने १ विकेट घेतला. नमन, तिलक आणि नीतीशच्या शानदार खेळीच्या जोरावर भारताने हा सामना ४ विकेट्स जिंकला.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत १८० धावा केल्या. ग्लेन फिलिप्स आण बेव्हॉन जेकब्सने तुफान फटकेबाजी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. फिलिप्सने ४३ चेंडूमध्ये दमदार खेळी करत ७० धावा केल्या. तर जेकब्सने ४६ चेंडूमध्ये ५८ धावांची खेळी केली.
भारत: संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, श्रेयस अय्यर (कर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंग, प्रिन्स यादव.
न्यूझीलंड: फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डॅरिल मिचेल, ग्लेन फिलिप्स, बेव्हॉन जेकब्स, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, मॅट हेन्री, जेकब डफी, लॉकी फर्ग्युसन.