ऋषभ पंत(फोटो-सोशल मीडिया)
IND vs NZ ODI Series :भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. ११ जानेवारीपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला एकदिवसीय सामना वडोदरा येथे खेळला जाणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, ऋषभ पंतला भारतीय एकदिवसीय संघात स्थान मिळेल का अशी चर्चा रंगली आहे. याबाबत आपण जाणून घेऊया.
ऋषभ पंत विजय हजारे ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी करत आहे. या स्पर्धेत ऋषभ पंतने चार सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावले आहेत. परंतु तो गेल्या १८ महिन्यांत एकही वनडे न खेळलेला नाही. जर न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी मालिकेतून पंत बाहेर पडला तर ते अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीचा चुकीचा निर्णय असू शकतो. भारतीय निवडकर्ते ११ जानेवारीपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा करणार आहेत. या संघात पंतला स्थान मिळते का हे पाहणे रंजक असणार आहे.
जर या मालिकेसाठी पंतला वगळण्यात आले, तर अनेक प्रश्न निर्माण होऊ शकतात. २०२५ मध्ये पंत चॅम्पियन्स ट्रॉफी संघाचा आणि गेल्या महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे संघाचा भाग होता. परंतु, पंत एक देखील एकदिवसीय सामना खेळलेला नाही. यावेळी सलामीवीर ऋतुराज गायकवाडला चौथ्या क्रमांकावर खेळवण्यात आले आणि पंतला तिन्ही सामन्यांमधून बाहेर ठेवण्यात आले.
ऋषभ पंतने २०१८ मध्ये पदार्पणापासून फक्त ३१ वनडे खेळला आहे. त्याने ३० जून २०१९ ते १४ जानेवारी २०२० दरम्यान ११ वनडे खेळले आहेत. त्यानंतर, कोविडनंतर, त्याने २६ मार्च २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ पर्यंत १५ वनडे सामने खेळले आहेत, ज्यामध्ये एक शतक समाविष्ट आहे. त्यानंतर त्याला एक भयानक कार अपघात झाला होता. २०२४ मध्ये पुनरागमन झाल्यापासून, तो कोलंबोमध्ये फक्त एक वनडे सामना खेळला आहे. विजय हजारे ट्रॉफीच्या चार सामन्यांमध्ये, तो एका सामन्यात फक्त ७० धावाच करू शकला आहे.
न्यूझीलंडविरुद्ध १५ सदस्यीय संघात तीन यष्टिरक्षक असण्याची शक्यता नाही. यष्टिरक्षक म्हणून केएल राहुल हा पसंतीचा फलंदाज असून ईशान पंतची जागा घेईल की जुरेल हे संघात घेईल हे पाहणे महत्वाचे आहे.
हेही वाचा : IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध ‘किंग’ कोहलीला नामी संधी! विराट तोडणार कुमार संगकाराचा ‘तो’ विक्रम
कर्णधार शुभमन गिलच्या पुनरागमनामुळे, दुसऱ्या टोकाला रोहित शर्माची उपस्थिती आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वालमुळे देवदत्त पडिकलची जागा अशक्य दिसून येत आहे. गोलंदाजीमध्ये, टी२० विश्वचषक लक्षात घेता, जसप्रीत बुमराह आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांना एकदिवसीय सामन्यांमधून विश्रांती देण्यात येऊ शकते. तसेच हर्षित राणा आणि अर्शदीप सिंग यांचा विचार देखील केला जाऊ शकतो. मोहम्मद शमी या मालिकेत पुनरागमनाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव हे फिरकी विभागाची धुरा सांभाळण्याची शक्यता आहे.






