Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…

Richard Pybus Questioned ICC Matches Timetable for Afghanistan: अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रिचर्ड पायबस यांनी आयसीसीच्या वेळापत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अफगाणिस्तानसारख्या संघांना संधी मिळत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 05, 2026 | 08:40 PM
IND Vs AFG: एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?; ICC च्या अजब वेळापत्रकावर अफगाणिस्तानचा प्रशिक्षक भडकला…
Follow Us
Follow Us:
  • एक मॅच खेळायची अन् ६ महिने बसायचं?
  • कसोटी वेळापत्रकाबाबत रिचर्ड पायबस नाराज
  • अफगाणिस्तानने पुढील कसोटी वेळापत्रक
अफगाणिस्तान संघ २०२६ मधील आपला पहिला कसोटी सामना भारताविरुद्ध खेळण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. परंतु, एकमेव कसोटी सामन्यापूर्वी अफगाणिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रिचर्ड पायबस (Richard Pybus) यांनी संघाच्या कसोटी वेळापत्रकाबाबत आयसीसीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या मते, एकदा एखादा देश पूर्ण सदस्य झाल्यावर, त्याच्या कसोटी सामन्यांचे वेळापत्रक नियमित असले पाहिजे. जर एखाद्या कसोटी सामन्याला पुढील सामन्यासाठी सहा महिने थांबावे लागत असेल, तर आयसीसीने याचे उत्तर दिले पाहिजे.

PAK vs AUS: कांगारू ढेपाळले! पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला चारली धूळ; 2-1 ने मालिका घातली खिशात

कसोटी वेळापत्रकाबाबत रिचर्ड पायबस नाराज

अफगाणिस्तानच्या अनियमित कसोटी वेळापत्रकाबाबत, भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रिचर्ड पायबस म्हणाले की,’ जेव्हा एखाद्या देशाला पूर्ण सदस्यत्व मिळते, तेव्हा त्याला नियमित सामन्यांचीही गरज असते. एक कसोटी सामना खेळून पुढच्या सामन्यासाठी सहा महिने वाट पाहणे योग्य नाही. असे होऊ शकत नाही की, केवळ विश्वचषकात संधी मिळाली म्हणून संघाचा विकास फक्त त्यावरच अवलंबून राहील. संघाचे प्रगती कायम ठेवण्यासाठी सातत्यपूर्ण क्रिकेट आवश्यक आहे. हा प्रश्न आयसीसीला विचारला पाहिजे, अफगाणिस्तानला नाही.’

ते पुढे म्हणाले की, ‘मला नाही वाटत की २० वर्षांपूर्वी कोणी कल्पना केली असेल की अफगाणिस्तान इतक्या वेगाने विकसित होईल. जेव्हा या मालिका दोन सामन्यांच्या होणार होत्या, तेव्हा मला ते अजिबात समजत नव्हते. कोणत्याही संघाला अनिर्णित मालिका खेळायला आवडत नाही. कसोटी मालिका फक्त तीन किंवा पाच सामन्यांचीच असावी. तरच मालिकेचा काही निकाल लागू शकतो.’

अफगाणिस्तानने पहिला कसोटी सामना कधी खेळला?

अफगाणिस्तानला २०१७ मध्ये आयसीसीचे पूर्ण सदस्यत्व मिळाले. त्यानंतर या संघाने २०१८ मध्ये बंगळूरु येथे भारताविरुद्ध आपला पहिला कसोटी सामना खेळला. मात्र, तेव्हापासून अफगाणिस्तानने केवळ १२ कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी त्यांनी पाच सामने जिंकले असून सात गमावले आहेत. २०२६ मध्ये देखील अफगाणिस्तान त्यांचा पहिला कसोटी सामना देखील भारताविरुद्धच खेळणार आहे.

अफगाणिस्तानने पुढील कसोटी वेळापत्रक

जून २०२६ मध्ये भारताविरुद्ध एकच कसोटी सामना खेळल्यानंतर , अफगाणिस्तान ऑगस्टमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धही एकच कसोटी सामना खेळेल. संघाचा पुढचा कसोटी सामना मार्च २०२७ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध होईल. याच कारणामुळे अफगाणिस्तानच्या मुख्य प्रशिक्षकाने संघाच्या कसोटी वेळापत्रकावरून आयसीसीवर टीका केली आहे. अफगाणिस्तानने आपला शेवटचा कसोटी सामना ऑक्टोबर २०२५ मध्ये खेळला होता. याचा अर्थ, भारताविरुद्धच्या सध्याच्या सामन्यापूर्वी संघ अंदाजे आठ महिने कसोटी क्रिकेटपासून दूर राहिला आहे.

सेकंदांचा उशीर अन् थेट बाद! महिला क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच ‘टाईम आऊट’चा थरार, ‘ही’ खेळाडू ठरली बळी

Web Title: Afghanistan coach richard pybus questioned icc matches timetable for afghanistan ahead of ind vs afg test 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 05, 2026 | 08:40 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket team
  • ICC
  • IND vs AFG
  • Indian Criket team

संबंधित बातम्या

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?
1

BCCI चा मास्टरस्ट्रोक? भारतात रंगणार पहिली महिला Champions Trophy 2027 स्पर्धा; पाकड्यांना करणार गेट आउट?

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.