Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 7 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! वयाच्या 38 व्या वर्षी ‘या’ वेगवान गोलंदाजाचे दु:खद निधन

शापूर जादरानचा उद्या 39 वा वाढदिवस होता. दिल्ली-NCR मधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 07, 2026 | 05:51 PM
क्रिकेटविश्वात मोठी खळबळ! वयाच्या 38 व्या वर्षी ‘या’ वेगवान गोलंदाजाचे दु:खद निधन
Follow Us
Follow Us:
  • वेगवान गोलंदाज शापूर झाद्रानचे निधन
  • भारतातील रूग्णालयात सुरू होते उपचार 
  • शापूर झाद्रानचे वयाच्या 38 व्या वर्षी झाले निधन 
Afghanistan Cricketer Death: अफगणिस्तान क्रिकेटसाठी एक अत्यंत दुर्दैवी आणि वाईट बातमी समोर येत आहे. अफगणिस्तानचा वेगवान गोलंदाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या खेळाडूचे दु:खद निधन झाले आहे. अफगाणिस्तान क्रिकेटला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलणारा माजी स्टार वेगवान (Cricket) गोलंदाज शापूर जादरान याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे.

शापूर जादरानचा उद्या 39 वा वाढदिवस होता. दिल्ली-NCR मधील एका खाजगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यान त्याची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली. ७ जुलै २०२६ रोजी वयाच्या ३८ व्या वर्षी त्याची प्राणज्योत मालवली.  अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने सोशल मीडियाद्वारे या दुःखद वृत्ताला दुजोरा दिला असून त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

शापूर जादरान गेल्या काही महिन्यांपासून ‘हेमोफॅगोसाइटिक लिम्फोहिस्टिओसायटोसिस’ (HLH) या अत्यंत गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याच्यावर दिल्ली-एनसीआर येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्याची प्राणज्योत मालवली आहे. या रोगामुळे शरीरातील पेशी आणि अवयवांना नुकसान होते. अशा दुर्मिळ आजाराशी तो झुंज देत होता.

إِنَّا لِلّهِ وَإِنَّـا إِلَيْهِ رَاجِعُونَ With profound grief and deep sorrow, the Afghanistan Cricket Board mourns the passing of former Afghanistan fast bowler Shapoor Zadran. Shapoor Zadran was one of the foundation-laying figures of Afghanistan cricket, whose dedication,… pic.twitter.com/iPIAJ6HLkq — Afghanistan Cricket Board (@ACBofficials) July 7, 2026

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाची प्रतिक्रिया काय?

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात शापूर जादरान आजारी पडला होता. त्यानंतर अफगाणिस्तानच्या डॉक्टर्सने त्याला भारतात जाऊन उपचार घेण्याचा सल्ला दिला होता. भारतात उपचार घेतल्यावर त्याला बारे वाटू लागले. त्याला डीस्चार्ज देण्यात आला. मात्र काही दिवसांनी पुनः त्याची ताब्यात बिघडली. शापूर जादरान हा अफगाणिस्तान क्रिकेटचा पाया रचणाऱ्या प्रमुख खेळाडूंपैकी एक होता. त्याचे समर्पण, खेळावरील प्रेम आणि अढळ वचनबद्धतेमुळेच आज अफगाण क्रिकेट इंटरनॅशनल स्तरावर पोहोचण्यास मदत झाली आहे.

क्रिकेटविश्व हादरलं! Team India मध्ये घडामोडींना वेग; ‘हा’ खेळाडू असणार नवा हेड कोच, कारण काय?

अफगाणिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शापूर जादरान याने आपल्या संघाला जागतिक स्तरावर नवी ओळख निर्माण करून देण्यासाठी फार मेहनत आणि कष्ट घेतले. त्याने अफगाणिस्तानसाठी वनडे आणि टी 20 सामने खेळले आहेत. त्याची वेगवान गोलंदाजी चाहत्यांना आवडत असे. वर्ल्डकप आणि टी 20 वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तानसाठी खेळणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक महत्वाचा खेळाडू होता.

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूचे योगदान अत्यंत चांगले असे राहिले आहे. त्याने अफगाणिस्तानच्या संघासाठी आतापर्यंत 44 एकदिवसीय सामने, 36 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने 44 सामन्यांत 43 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने टी 20 क्रिकेटमध्ये 37 विकेट्स घेतल्या आहेत. फारस्ट क्लास क्रिकेटमध्ये देखील त्याने चांगली गोलंदाजी करत अनेक विकेट्स मिळवल्या आहेत. त्याने शेवटचा सामना 10 मार्च 2019 मध्ये डेहराडून येथे आयर्लंडविरुद्ध खेळला होता. त्याच्या दु:खद निधनाने क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

Web Title: Afghanistan former faster bowler shapoor zadran death 38 years cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 07, 2026 | 05:10 PM

Topics:  

  • Afghanistan Cricket
  • cricket news
  • Death

संबंधित बातम्या

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार
1

MS Dhoni Birthday: विजेचा वेग, पोलादी धैर्य, प्रत्येक आव्हान झाले नतमस्तक; तिकिट कलेक्टर धोनी ते सर्वश्रेष्ठ कर्णधार

मावळ तालुक्यावर शोककळा; पाटणमध्ये दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू
2

मावळ तालुक्यावर शोककळा; पाटणमध्ये दरड कोसळून तिकोणे कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास
3

Ellyse Perry 9 ICC Trophies: एलिस पेरीचा धमाका! 9 वेळा ICC ट्रॉफीवर नाव कोरून रचला इतिहास

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद
4

ENG W vs AUS W: कांगारूंचा पुन्हा एकदा महाधमाका! ऑस्ट्रेलियाने इंग्लंडला ७ विकेट्सने चिरडले; सातव्यांदा पटकावले विश्वविजेतेपद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.