व्हीव्हीएस लक्ष्मण असणार नवे हेड कोच (फोटो- सोशल मीडिया)
गौतम गंभीर सध्या इंग्लंड दौऱ्यात व्यस्त आहेत. त्यामुळे बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी काही प्रमाण विभागली आहे. बीसीसीआयने कोचिंगची जबाबदारी विभागली असून जिम्बाब्वे दौरा आणि सप्टेंबरमधील एशियन गेम्ससाठी लक्ष्मण यांच्याकडे मुख्य प्रशिक्षकपद सोपवले आहे.
14 ते 19 जुलै दरम्यान भारत अन् इंग्लंड तीन वनडे सामने खेळणार आहे. त्यानंतर 23 जुलैपासून भारत झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. 23 जुलै रोजी भारत झिम्बाब्वेविरुद्ध पहिला टी 20 सामना खेळणार आहे. त्यामुळे व्हीव्हीएस लक्ष्मणकडे हेड कोच पदाची जबाबदारी देण्याची बीसीसीआयने सोपवली आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण एशियन गेम्स आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत.
पराभवानंतरही अय्यरची कॅप्टन्सी कायम! Sanju Samson आऊट; झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
झिम्बाब्वेविरुद्ध Team India ची घोषणा
लवकरच भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यामध्ये तीन सामन्यांची टी 20 सिरिज होणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. सोशल मिडियावर पोस्ट करत बीसीसीआयने ही माहिती दिली आहे. श्रेयस अय्यर भारताचे नेतृत्व करताना दिसणार आहे. तर रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. संजू सॅमसनला डच्चू देण्यात आला आहे. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्ध अपयशी ठरल्याचा त्याला फटका बसला आहे. मात्र भारताचे सलग तीन पराभव झाले तरी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
वादळ येणार, ब्रिटिशांचा सुपडा साफ होणार! Rohit Sharma चा नेट्समध्ये कसून सराव, Video Viral
झिम्बाब्वेविरुद्ध तीन टी 20 सामन्यांच्या मालिकेत रिंकू सिंगची वापसी झाल्याचे दिसून येत आहे. तर या सिरिजमध्ये 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीने देखील आपली जागा कायम ठेवली आहे.
भारतीय संघ: श्रेयस अय्यर, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, तिलक वर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हर्ष दुबे, प्रिन्स यादव, वरुन चक्रवर्ती, मयंक यादव, यश ठाकूर, अशोक शर्मा , प्रभसिमरन सिंग






