अजिंक्य रहाणे विदेशात क्रिकेट खेळणार (फोटो- ians)
26 ऑगस्ट 2026 पासून अजिंक्य रहाणे युरोपियन टी 20 प्रीमियर लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. युरोपियन टी 20 प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात ॲमस्टरडॅम फ्लेम्स या संघाने अजिंक्य रहाणेची मार्की खेळाडू म्हणून निवड केली आहे. ॲमस्टरडॅम फ्लेम्स संघाने अजिंक्य रहाणे बाबत शिक्कामोर्तब केले आहे.
अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक फलंदाज समजला जातो. तसेच त्याच्याकडे टी 20 क्रिकेटचा मोठ्या प्रमाणात अनुभव आहे. अजिंक्य रहाणेने 308 टी 20 सामन्यांमध्ये 7968 रन्स केले आहेत. तसेच त्याने टी 20 फॉर्मटमध्ये 56 अर्धशतके आणि 2 शतके लगावली आहेत.
अजिंक्य रहाणेने नुकतीच इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपली निवृत्ती जाहीर केली आहे. ‘क्रिकेटने मला खूप काही दिले आहे. हा खेळ युरोपमध्ये प्रसिद्ध असलेली एक रोमांचक टप्प्यात प्रवेश करत आहे. मैदानावर आणि मैदानाबाहेर नवनवीन प्रयोग करण्याची ॲमस्टरडॅम फ्लेम्स यांची इच्छा मला जास्त प्रभावित करते. युरोपमधील क्रिकेटचे भविष्य अधिक मजबूत करण्यासाठी व्यवस्थापनासोबत काम करण्यास मी उत्सुक आहे,’ असे अजिंक्य रहाणे याने म्हटल्याचे समोर येत आहे.
तारीख: २६ ऑगस्ट २०२६
सामना: ॲमस्टरडॅम फ्लेम्स विरुद्ध रॉटरडॅम डॉकर्स
वेळ: भारतीय वेळेनुसार (IST) संध्याकाळी ६:४५ वाजता
मैदान: स्पोर्टपार्क डुइवेस्टीन स्टेडियम, वूरबर्ग.






