Indian cricketer Venkatesh Iyer married : KKR चा सध्याचा स्टार खेळाडू व्यंकटेश अय्यरने IPL 2024 जिंकल्यानंतर 2 जून 2024 रोजी श्रुती रघुनाथनशी लग्न उरकून घेतले. कोलकाता चॅम्पियन झाल्यानंतर हा विवाह योग व्यंकटेशसाठी आनंदाचा दुहेरी षटकार म्हणता येईल. कारण त्याने आपल्या संघाला आयपीएलचे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अन् आता त्याच्या वैयक्तिक जीवनात तो नवीन आयुष्याला सुरुवात करीत आहे.
व्यंकटेश अय्यरने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली
व्यंकटेश अय्यर यांची पत्नी ही प्रतिभेची खाण आहे, खेळापासून फॅशनपर्यंत सर्वत्र तिचे आकर्षण आहे. कोलकाता नाइट रायडर्सने आयपीएल 2024 चे विजेतेपद पटकावले. IPL 2024 नंतर KKR चॅम्पियन व्यंकटेश अय्यरने आपल्या आयुष्याची नवी इनिंग सुरू केली आहे. व्यंकटेश अय्यर यांचा रविवारी सकाळी श्रुती रघुनाथनसोबत विवाह झाला. दोघांनी 2022 मध्ये एकमेकांशी लग्न केले आणि आता दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत.
एकमेकांशी साखरपुडा पार पडला
दोघांनी 2022 मध्ये एकमेकांशी साखरपुडा पार पडला आणि आता दोघेही लग्नाच्या बंधनात बांधले गेले आहेत. व्यंकटेश अय्यर आणि त्यांच्या पत्नीचे सुंदर फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत. त्यानंतर चाहते त्यांचे अभिनंदन करीत आहेत. चला जाणून घेऊया व्यंकटेश अय्यर यांची पत्नी कोण आहे?