Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

 IND vs NZ  T20 series : रिंकू सिंगवर होणार ‘हनुमाना’चा कोप? न्यूझीलंड विरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी ‘त्या’ पोस्टमुळे खळबळ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार, या मालिकेपूर्वीच भारतीय संघाचा भाग असणाऱ्या स्फोटक फलंदाज रिंकू सिंगच्या एका रीलमुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 19, 2026 | 04:41 PM
IND vs NZ T20 series: Will Rinku Singh face the wrath of 'Hanuman'? Controversy erupts due to 'that' post before the T20 series against New Zealand.

IND vs NZ T20 series: Will Rinku Singh face the wrath of 'Hanuman'? Controversy erupts due to 'that' post before the T20 series against New Zealand.

Follow Us
Close
Follow Us:

Rinku Singh’s troubles have increased : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात नुकतीच तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका संपली असून या मालिकेत न्यूझीलंडने २-१ असा विजय मिळवला आहे. या दोन देशात २१ तारेखपासून पाच टी २० सामन्यांची मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत रिंकू सिंग टीम इंडियाचा भाग आहे. या मालिकेपूर्वीच रिंकू सिंगच्या अडचणी वाढताना दिसत आहे. दीर्घकाळानंतर भारतीय संघात परतलेल्या रिंकू सिंग त्याच्या एका सोशल मीडिया रीलमुळे वादात सापडला आहे.  एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलेल्या रीलमुळे त्याच्याविरुद्ध तक्रार देखील दाखल केली गेली आहे.

हेही वाचा : IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी

नेमका वाद काय?

भारताचा स्फोटक फलंदाज रिंकू सिंगकडून अलीकडेच सोशल मीडियावर एक रील शेअर करण्यात आला आहे. या रीलमध्ये  तो त्याच्या क्रिकेट यशाचे श्रेय देवाला देताना दिसत असून व्हिडिओमध्ये भगवान हनुमान, भगवान विष्णू, भगवान शिव आणि भगवान गणेश कारमध्ये चष्मा घालताना दिसत आहेत. रिंकू सिंगने षटकार मारतानाचे दृश्ये देखील संपूर्ण रीलमध्ये छेडले गेले आहेत. हा संपूर्ण व्हिडिओ एआय तंत्रज्ञान वापरून बनवण्यात आला होता. तथापि, हीच रील आता त्याच्यासाठी वादाचे कारण बनले आहे.

धार्मिक भावना दुखावल्याचा करण्यात आला आरोप

रिंकू सिंगने शेअर केलेल्या या रीलवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही चाहते रिंकू सिंगला पाठिंबा देखील देताना दिसत आहेत. याला श्रद्धा आणि श्रद्धेचा विषय म्हणत आहेत, तर काही आक्षेप घेण्यात येत आहेत. निषेध करणाऱ्यांचे मत आहे की, अशा प्रकारे देवतांचे चित्रण केल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत. यासंदर्भात, करणी सेनेकडून अलीगडमधील सासनी गेट पोलिस स्टेशनमध्ये रिंकू सिंगविरुद्ध लेखी तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.

रिंकू सिंगने  जाहीर माफी मागावी

करणी सेनेचे म्हणणे आहे की रिंकू सिंगने शेअर केलेली रील आक्षेपार्ह असून  त्याच्यावर कारवाई करण्यात यावी. एक जबाबदार खेळाडू म्हणून रिंकू सिंगने या प्रकरणाबद्दल जाहीरपणे माफी देखील मागावी असे संघटनेचे म्हणणे आहे. या तक्रारीनंतर, प्रकरण वाढले आहे.

रिंकूने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चमक

क्रिकेटबद्दल सांगायचे झाले तर, रिंकू सिंगने अलीकडेच विजय हजारे ट्रॉफीमध्ये उत्तर प्रदेश संघाचे नेतृत्व केले आहे. त्याने आपला संघ  उपांत्यपूर्व फेरीत पोहोचवला होता. तथापि, सौराष्ट्र विरुद्धच्या दुसऱ्या क्वार्टर फायनलमध्ये उत्तर प्रदेशचा १७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला आणि संघ स्पर्धेतून बाहेर पडला. तथापि,  न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी हा वाद मिटतो का? हे बघणे महतावचे ठरणार आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान

 

Web Title: Ahead of the ind vs nz t20 series rinku singh is in trouble because of a hanuman reel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी 
1

IND vs NZ : ‘त्याच्या क्षेत्ररक्षणात चुका…’, भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी 

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…
2

India vs New Zealand : गौतम गंभीरची चाहत्यांनी घेतली शाळा! ODI मालिका गमावल्यानंतर हेड कोचवर फुटलं भांड…

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर
3

IND vs NZ : न्यूझीलंडच्या खेळाडूंची थरथरले…माजी निवडकर्त्याने विराट कोहलीला नाही तर या खेळाडूला सांगितले गेम चेंजर

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral
4

Virat Kohli Funny Video : लाईव्ह सामन्यादरम्यान संतापला विराट कोहली, Daryl Mitchell कंटाळून दिला धक्का! Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.