भारताच्या पराभवाने कर्णधार गिलवर अजिंक्य रहाणेची नाराजी(फोटो-सोशल मीडिया)
Ajinkya Rahane’s comments about Shubman Gill : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातरविवारी इंदूरमध्ये तीन एकदिवसीय मालिकेमधील तिसरा आणि शेवटचा सामना खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने डॅरिल मिशेल आणि ग्लेन फिलिप्सच्या शतकांच्या जोरावर भारताविरुद्ध ३३८ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता. प्रत्युउत्तरात भारताला ४६ षटकात सर्वबाद २९६ धावाच करता आल्या होत्या. परिणामी भारताने ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवावर भारताचा फलंदाज अजिंक्य राहणेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याने कर्णधार शुभमन गिलच्या रणनितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि न्यूझीलंड संघाला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. अर्शदीप आणि हर्षित राणा यांनी पहिल्या सात चेंडूत दोन्ही किवी सलामीवीरांना माघारी पाठवले.तथापि, त्यानंतर भारत पाहुण्यांवर दबाव निर्माण करण्यात अपयशी ठरला. डॅरिल मिशेल आणि फिलिप्स यांनी चौथ्या विकेटसाठी २१९ धावांची मोठी भागीदारी केली. मधल्या षटकांमध्ये कर्णधार गिलच्या रणनीतीवर टीका करताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, “त्याने क्षेत्ररक्षणात चुका केल्या होत्या. विशेष म्हणजे, भारतीय फिरकीपटू कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी फक्त सहा षटकेच टाकली, तर अष्टपैलू नितीश कुमार रेड्डी यांनी आठ षटके टाकली, जरी तो एकही बळी घेता आला नाही.”
हेही वाचा : बांगलादेशच्या नावाखाली पाकिस्तानने घातला गोंधळ, T20 World Cup 2026 मध्ये सहभागी न होण्याची दिली धमकी
भारताच्या पराभवानंतर क्रिकबझशी संवाद साधताना अजिंक्य रहाणे म्हणाला की, “वैयक्तिकरित्या, मला वाटते की शुभमनने कुलदीपला मधल्या षटकांमध्ये फक्त तीन षटके देऊन आणि नंतर ३७ व्या-३८ व्या षटकापर्यंत वाट पाहण्याची चूक केली, जडेजाला देखील ३० व्या षटकापर्यंत थांबून ठेवण्यात आले. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. इथेच भारताकडून चूक झाली.”
अनुभवी भारतीय जलदगती गोलंदाज झहीर खानने रहाणेच्या मुद्द्याला समर्थन देत म्हटले की, “जडेजाला विशेषतः प्रथम गोलंदाजी करू द्यायला हवी होती.” झहीर खान पुढे म्हणाला की, “कुलदीपपेक्षा, समस्या रवींद्र जडेजाला गोलंदाजी करण्यासाठी खूप उशिरा आणण्याची होती. कदाचित त्यांचा हेतू नितीश रेड्डीला सामन्याच्या परिस्थितीनुसार थोडा जास्त वेळ आणि षटके देण्याचा राहिला होता, परंतु यामुळे तुमचे पर्याय मर्यादित होऊन जातात. ”
हेही वाचा : T20 World Cup 2026 : ‘वानखेडे स्टेडियमवर खेळणे भावनिक….’, ‘या’ भारतीय वंशाच्या अमेरिकन गोलंदाजाचे विधान
न्यूझीलंडविरुद्धची ही मालिका रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादवसाठी निराशाजनक राहिली. दोन्ही गोलंदाज आपली छाप पाडण्यात अपयशी ठरले. कुलदीप यादवने तीन सामन्यांमध्ये ६०.६७ च्या सरासरीने २५.० षटके गोलंदाजी केली. कुलदीप यादवला ७.२८ पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटसह फक्त तीन विकेट्स चटकावता आल्या. रविवारी जडेजाने सहा षटकांत ४१ धावा मोजल्या. वडोदरा येथील पहिल्या सामन्यात त्याने नऊ षटकांत ५६ धावा दिल्या होत्या, तर राजकोट येथे त्याने आठ षटकांत ४४ धावा दिल्या. या मालिकेत जडेजाला एक देखील विकेट काढता आलेली नाही.






