अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकरला मुंबईमध्ये खेळणे भावनिक(फोटो-सोशल मीडिया)
T20 World Cup 2026 : पुढील महिन्यात आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेला सुरुवात होणार आहे. ७ फेब्रुवारीला भारत आणि अमेरिका यांच्यात सलामी सामना होणार आहे. श्रीलंका आणि भारत टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहेत. दरम्यान, मुंबईत जन्मलेला अमेरिकन वेगवान गोलंदाज सौरभ नेत्रावलकर ७ फेब्रुवारी रोजी वानखेडे स्टेडियमवर भारताविरुद्ध होणाऱ्या त्याच्या संघाच्या पहिल्या टी-२० विश्वचषक सामन्यात मैदानात उतरण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. हे तेच मैदान आहे जिथे त्याची क्रिकेट कारकीर्द सुरू झाली. त्यानंतर तो करिअर करण्यासाठी अमेरिकेत गेला आणि नागरिकत्व मिळवल्यानंतर तो राष्ट्रीय संघाचा सदस्य बनला.
३४ वर्षीय खेळाडूने २०१३ मध्ये सूर्यकुमार यादव आणि शार्दुल ठाकूर सारख्या खेळाडूंसोबत मुंबईसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट देखील खेळला, परंतु २०१० च्या १९ वर्षांखालील विश्वचषकात भारताचे प्रतिनिधित्व केल्यानंतर, तो वरिष्ठ संघात स्थान मिळवू शकला नाही. नेत्रावलकरने अखेर २०१५ मध्ये अमेरिकेत उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला आणि प्रतिष्ठित कॉर्नेल विद्यापीठातून संगणक शास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळवली.
आयुष्यात त्याने निवडलेला मार्ग पाहता, नेत्रावलकर याने कधीच कल्पना केली नव्हती की तो पुन्हा क्रिकेट खेळेल, परंतु नशिबाच्या मनात वेगळेच होते. नेत्रावलकर अमेरिकन संघात सामील झाला आणि २०२४ च्या टी-२० विश्वचषकातही खेळला. वानखेडे स्टेडियमवर पुन्हा पाऊल ठेवल्यावर भावना त्यांच्यावर भारावून जाऊ शकतात असे त्याला वाटते. नेत्रावलकरने सांगितले की, वानखेडेवर खेळणे हा त्यांच्यासाठी भावनिक क्षण असणार आहे. मी तिथे पोहोचल्यावर कशी प्रतिक्रिया देईन हे मला माहित नाही, परंतु तो निश्चितच भावनिक क्षण असणार आहे.
हेही वाचा : बांगलादेशच्या नावाखाली पाकिस्तानने घातला गोंधळ, T20 World Cup 2026 मध्ये सहभागी न होण्याची दिली धमकी
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. काल या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना इंदूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा ४१ धावांनी दणदणीत पराभव केला आहे. नाणेफेक गमावणाऱ्या न्यूझीलंड संघाने डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलिप्स यांच्या शतकाच्या जोरावर ८ गडी गमावून ३३७ धावा केल्या आहेत. भारताला ४६ ओव्हरमध्ये सर्वबाद ३३८ धावाच करता आल्या. परिणामी भारताला ४१ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या विजयासह न्यूझीलंडने ही मालिका २-१ ने आपल्या नावे केली आहे.






