Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajit Pawar Plane Crash : ‘एक समर्पित नेता गमावला..’ उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाने क्रिकेट विश्व हळहळले

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये निधन झाले. अजित पवार यांच्या निधनावर भारताचा माजी दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने शोक व्यक्त केला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 28, 2026 | 06:30 PM
Ajit Pawar Plane Crash: 'A dedicated leader has been lost...' The cricket world mourns the death of Deputy Chief Minister Ajit Pawar.

Ajit Pawar Plane Crash: 'A dedicated leader has been lost...' The cricket world mourns the death of Deputy Chief Minister Ajit Pawar.

Follow Us
Close
Follow Us:

Sachin Tendulkar expressed his condolences on the passing of Ajit Pawar : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी सकाळी बारामती येथे झालेल्या विमान अपघातामध्ये दुख:द निधन झाले. या अपघातात विमानात पप्रवास जरीत असलेल्या सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांच्या निधनाने सर्वच क्षेत्रातातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. क्रिकेट जगतातून देखील अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. दरम्यान, सचिन तेंडुलकर आणि अजिंक्य रहाणे सारख्या दिग्गज क्रिकेटपटूंनी शोक व्यक्त केला आहे.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : भारतीय फिरकीपटू कामगिरी उंचावणार? न्यूझीलंडविरुद्ध दबदबा ठेवणार सूर्याआर्मी

सचिन तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले की, “अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्राने संपूर्ण राज्यातील लोकांसाठी काम करणारा एक समर्पित नेता गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना माझ्या मनापासून संवेदना. ओम शांती.”

तसेच अजित पवार यांच्या निधनाबद्दल अजिंक्य रहाणे याने देखील शोक व्यक्त केला आहे. अजिंक्य रहाणेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की,  “महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा यांच्या दुःखद निधनाने मी दुःखी आहे. त्यांच्या कुटुंबियांना माझ्या संवेदना आहेत.”

अजित पवार यांच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. महाराष्ट्रासाठी काम करणारा एक चांगला नेता आज आपण अचानक गमावला आहे. पवार कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली. ॐ शांती. 🙏🏽
Very sad to learn about the untimely demise of… — Sachin Tendulkar (@sachin_rt) January 28, 2026

महाराष्ट्रातील प्रभावी नेते

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक नेते होते. त्यांच्या निधनाने राज्य आणि राष्ट्रीय राजकीय क्षेत्रात धक्का बसला आहे. अजित पवार यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. त्यांनी त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राजकारणात प्रवेश करून विविध महत्वाची पदं त्यांनी भुसवली आहेत. अजित पवार हे शरद पवार यांचे मोठे बंधू अनंतराव पवार यांचे पुत्र होते. त्यांनी बारामती येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले.

अजित पवार यांनी वयाच्या २३ व्या वर्षी राजकारणामध्ये प्रवेश केला. सुरुवातीला त्यांनी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळासाठी निवडणूक लढवली होती. त्यानंतर, १९९१ मध्ये ते पुणे मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षही झाले होते.  त्याच वर्षी त्यांनी बारामती संसदीय मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवून जिंकली देखील होती. परंतु, नंतर त्यांनी ती जागा त्यांचे काका शरद पवार यांना सोडली होती. त्यानंतर शरद पवार केंद्रीय राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आणि अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाची सूत्रे हातात घेऊन सर्व काम पाहू लागले.

Saddened by the tragic passing of Maharashtra Deputy CM Ajit Pawar dada. My thoughts are with his family. 🙏 — Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) January 28, 2026

१९९५ मध्ये आमदार म्हणून निवडून आले

अजित पवार १९९५ मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आले होते. त्यानंतर ते १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ मध्ये सलग विजय मिळवला. बारामती हा पवार कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जातो. अजित पवार यांनी १९८५ मध्ये सुनेत्रा पवार यांच्याशी लग्न केले. त्यांना पार्थ पवार आणि जय पवार ही दोन मुले आहेत.

हेही वाचा : IND vs NZ 4th T20I : ‘भारताच्या फलंदाजांना रोखावे…’ चौथ्या T20I सामान्यापूर्वी न्यूझीलंडच्या फलंदाजी प्रशिक्षकाचे संघाला आवाहन

महाराष्ट्राचे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री

अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक वेळा काम केले आहे. महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणून त्यांनी कृषी, ऊर्जा, नियोजन, ग्रामीण विकास आणि जलसंपदा शा  महत्त्वाच्या खात्यांचा कारभार सांभाळलेला आहे.  त्यांनी कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन प्रकल्पांची  जबाबदारी देखील सांभाळली.

Web Title: Ajit pawar plane crash rahane and sachin tendulkar express grief over ajit pawars death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 06:30 PM

Topics:  

  • Ajinkya Rahane
  • ajit pawar plane crash
  • DCM Ajit Pawar
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

”आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही, खूप त्रास होतोय…”, अजित पवारांच्या निधनानंतर संकरशन कऱ्हाडेची भावूक पोस्ट, म्हणाला…
1

”आज घरातलं कुणीतरी आपल्यात नाही, खूप त्रास होतोय…”, अजित पवारांच्या निधनानंतर संकरशन कऱ्हाडेची भावूक पोस्ट, म्हणाला…

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?
2

Ajit Pawar Plane Crash: “तो आवाज कानात घुमतो आहे”, अपघातापूर्वी अजित पवारांनी शेवटचा फोन कुणाला केला होता?

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया
3

Ajit Pawar Passed Away : बातमी कळताच मनात धस्स झाले! अजित पवारांच्या निधनावर आमदार सुनील शेळकेंची भावूक प्रतिक्रिया

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…
4

Helicopter Crash And Plane Crash: विमान अपघात की हेलिकॉप्टर अपघात, कोणते जास्त धोकादायक? विमान कसं कोसळतं…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.