
ऑस्ट्रेलिया ‘अ’ महिला संघाविरुद्धच्या तीन मालिकांसाठी बीबीसीआयने भारतीय ‘अ’ संघात अनुष्का शर्माला टी-२० मालिकेचे कर्णधारपद सोपवले आहे. तर, सायली सातघरेकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी जूनमध्ये इंग्लंड दौऱ्यावर झालेल्या टी-२० मालिकेत २-१ ने विजय मिळवणाऱ्या भारतीय ‘अ’ संघाचे नेतृत्व अनुष्काने केले होते. भारतीय संघाची माजी १९ वर्षांखालील कर्णधार निक्की प्रसादचा तिन्ही मालिकांसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. ती अलीकडेच महाराजा टी-२० ट्रॉफीचे विजेतेपद पटकावणाऱ्या हुबळी टायगर्स संघाचाही एक भाग होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी अष्टपैलू खेळाडू अमनदीप कौरचा भारतीय महिला ‘अ’ संघात प्रथमच समावेश करण्यात आला आहे. ती एकदिवसीय मालिकेचा भाग असेल. तिन्ही टी-२० सामने १२, १५ आणि १७ सप्टेंबर रोजी चंदीगडच्या मैदानावर खेळले जातील, तर एकदिवसीय मालिकेचे सामने २०, २३ आणि २५ सप्टेंबर रोजी मोहालीच्या पीसीए स्टेडियमवर खेळले जातील. यानंतर, २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान धर्मशाळा स्टेडियमवर चार दिवसांचा एकच अनधिकृत कसोटी सामना खेळला जाईल.
अनुष्का शर्मा (कर्णधार), सायली सातघरे (उपकर्णधार), वृंदा दिनेश, सुजाता डे, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, शिप्रा गिरी (विकेटकीपर), श्वेता सेहरावत, उमा छेत्री (विकेटकीपर), तनुजा कंवेर, मिन्नू मणी, वैष्णवी शर्मा, जिन्तिमणि कलिता, शबनम शकील, सिमरन दिल बहादुर.
यास्तिका भाटिया (कर्णधार, यष्टिरक्षक), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), वृंदा दिनेश, प्रिया पुनिया, तनिषा सिंग, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, उमा छेत्री (विकेटकीपर), मिन्नू मणी, अमनदीप कौर, वैष्णवी शर्मा, सायली सातघरे, जिन्तिमणि कलिता, शबनम शकील, अक्षिता भगत.
यास्तिका भाटिया (कर्णधार, यष्टिरक्षक), अनुष्का शर्मा (उपकर्णधार), शुभा सतीश, प्रिया पुनिया, तनिषा सिंग, तेजल हसबनीस, निक्की प्रसाद, ममता माडीवाला (विकेटकीपर), सुश्री दिव्यादर्शिनी, शुची उपाध्याय, वैष्णवी शर्मा,सायली सातघरे, अक्षिता भगत, जिन्तिमणि कलिता, शबनम शकील.