BCCI may send 'B' team to Asian Games
बीसीसीआयच्या एका सूत्राने एका वृत्तसंस्थेला सांगितले की, जपानमध्ये क्रिकेटपटूंसाठी केलेल्या सुविधा आणि व्यवस्थेमुळे बीसीसीआय आणि एसीसी नाराज आहेत. यामुळे तेथे एक निरीक्षक पाठवण्याचा विचार करत आहेत. जर सुविधा अपुऱ्या असल्याचे आढळले, तर बीसीसीआय स्पर्धेसाठी ‘बी’ संघ पाठवण्याचा विचार करू शकते.
सूत्राने सांगितले की, ‘बीसीसीआय आणि एसीसी जपानमधील सुविधा आणि व्यवस्थेमुळे नाराज आहेत आणि बीसीसीआय तेथे एक निरीक्षक पाठवेल. तो आम्हाला त्याचा अहवाल सादर करेल आणि जर व्यवस्था अपेक्षेनुसार नसेल, तर आम्ही ‘बी’ संघ पाठवण्याचा विचार करू शकतो. आम्ही एसीसीच्या बैठकीदरम्यान जपानच्या ऑलिम्पिक अधिकाऱ्यांना सांगितले की, ड्रेसिंग रूम तंबूंमध्ये उभारण्यात आल्या आहेत आणि शौचालये त्या तंबूंपासून ५०० मीटर दूर आहेत, ज्यामुळे खेळाडूंसाठी असमाधानकारक परिस्थिती निर्माण होत आहे. शिवाय, हॉटेलच्या खोल्या खूपच लहान आहेत, ही एक मोठी चिंतेची बाब आहे.’
२०२३ मध्ये चीनच्या हांगझू येथे झालेल्या स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदक जिंकले होते. या अंतिम सामन्यात पावसामुळे रद्द झाल्यानंतर चांगल्या मानांकनाच्या आधारावर भारताला विजेता घोषित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने कर्णधार श्रेयस अय्यर, डावखुरे फलंदाज अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन आणि तिलक वर्मा ही आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व अर्शदीप सिंग यांचा समावेश असलेला एक मजबूत संघ जाहीर केला होता. भारतीय महिला संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत असून, त्यात वरिष्ठ स्तरावर नियमितपणे खेळणाऱ्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. त्यामुले बीसीसीआय आता संघामद्ये बदल करणार तसेच स्टार खेळाडूंना विश्रांती देणार का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
आशियाई खेळांसाठी भारतीय पुरुष संघ:
श्रेयस अय्यर (कर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उप-कर्णधार), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, वैभव सूर्यवंशी, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.






