अर्शदीप सिंगने केली निराशा (फोटो- ai gemini)
गुजरातने पंजाबला दिले 163 धावांचे लक्ष्य
अर्शदीप सिंगने एकाच ओव्हरमध्ये टाकले 11 वाईड
गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजीला रोखले
PBKS vs GT IPL 2026 Live: आज चंदीगडमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. यामध्ये पंजा किंग्जचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर गुजरात टायटन्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीप सिंग स्वतःच्या संघाला शिक्षा दिल्याचे पाहायला मिळाले. नेमके काय घडले ते जाणून घेऊयात.
अर्शदीप सिंगने आपल्या आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात निराशाजनक कामगिरी केली. 4 ओव्हर्समध्ये एकही विकेट न घेता त्याने तब्बल 42 धावा दिल्या. अर्शदीप सिंगने आपल्या 4 ओव्हर्समध्ये एकूण 9 अतिरिक्त चेंडू टाकले. शेवटच्या ओव्हरमध्ये तर अर्शदीप सिंगने कहर केल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे गुजरात टायटन्सचा संघ काही अतिरिक्त धावा जोडण्यात यशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले.
शेवटची म्हणजेच 20 वी ओव्हर दोन्ही संघासाठी महत्वाची समजली जाते. ही ओव्हर टाकण्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने अर्शदीप सिंगला चेंडू सोपवला. मात्र अर्शदीप सिंगने निराशा केली. त्याने त्या शेवटच्या ओव्हर्समध्ये चार वाईड आणि एक नो बॉल टाकला. डेथ ओव्हरसाठी अर्शदीप सिंगला ओळखले जाते. मात्र त्याने यावेळी निराशा केली. त्याने चार ओव्हर्स टाकल्या मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही.
GT vs PBKS: Gujrat चा खेळ संपला! Punjab चे ‘किंग्स’ 163 धावांचे आव्हान पेलणार का?
गुजरात टायटन्सची फलंदाजी कशी राहिली?
प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्स ने 6 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. तर गुजरात टायटन्सने पंजाबला 163 धावांचे लक्ष्य दिले होते. डावाची सुरुवात करण्यासाठी गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल आणि साई सुदर्शन मैदानात उतरले. दोघांनी सावध फलंदाजी करत संघाला पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात करून दिली.
पंजाब किंग्सची संभाव्य टीम: प्रियांश आर्या, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टोइनिस, शशांक सिंग, अजमतुल्लाह ओमरजई, मार्को यान्सन, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल, कूपर कानोली
GT Vs PBKS Pitch Report: टॉस ठरणार ‘बॉस’! खेळपट्टीचा काय नेम नाही अन्…; कोणाची धुलाई होणार?
गुजरात टायटन्सची संभाव्य टीम: शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जॉस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, कागिसो रबाडा, शाहरुख खान, राशिद खान, प्रसिद्ध कृष्णा






