IND vs UAE: Sixer on the first ball and..! Abhishek Sharma makes history; became the first Indian batsman to do so
Abhishek Sharma creates history in T20 : आशिया कप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने यूएई संघाला ९ विकेट्सने पराभूत केले. या सामन्यात भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत यूएईला ५७ धावांवर सर्वबाद केले होते. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. धावांचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने ५८ धावांचे लक्ष्य फक्त २७ चेंडूत गाठले आणि आशिया कप स्पर्धेला विजयी सुरवात केली. या दरम्यान भारतीय संघाचा स्टार सलामीवीर अभिषेक शर्माने डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकून इतिहास रचला आहे. या कामगिरीसह टी-२० मध्ये डावाच्या पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा तो चौथा भारतीय फलंदाज बनला आहे. तर लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा अभिषेक शर्मा हा पहिला फलंदाज बनला आहे.
हेही वाचा : Asia cup 2025 : Bangladesh चा TOSS जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय; Hong Kong पहिल्या विजयाच्या शोधात
आशिया कपमधील पहिल्या सामन्यात त्याने यूएईविरुद्ध षटकार मारून डावाची सुरुवात केली. अभिषेक शर्माने लॉन्ग ऑफवर षटकार मारून आपल्या डावाची धमाकेदार सुरुवात केली. त्याने १६ चेंडूंचा सामना करत ३० धावांची वादळी खेळी केली. यादरम्यान त्याने दोन चौकार आणि तीन षटकार देखील मारले.
रोहित शर्मा (अहमदाबाद २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्ध), यशस्वी जयस्वाल (हरारे २०२४ मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध) आणि संजू सॅमसन (मुंबई २०२५ मध्ये इंग्लंडविरुद्ध) यांच्यानंतर टी२० क्रिकेटच्या इतिहासात पहिल्या चेंडूवर षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता अभिषेक शर्मा चौथा खेळाडू म्हणून सामील झाला आहे.
धावांचा पाठलाग करताना भारताचा सलामीवर फलंदाज अभिषेक शर्माने पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची किमया साधली आहे. धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाकडून पहिल्याच चेंडूवर षटकार मारण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. यापूर्वी, पहिल्या डावात सर्व फलंदाजांनी असा पराक्रम करण्यात आला आहे.
हेही वाचा : मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. तर प्रथम फलंदाजी करताना यूएई संघ फक्त ५७ धावा करून सर्वबाद झाला. यूएईकडून अलिशान शराफूने सर्वाधिक २२ धावा केल्या. भारताकडून फिरकीपटू कुलदीप यादव(४) आणि अष्टपैलू खेळाडू शिवम दूबे(३) या दोघांनी मिळून ७ विकेट्स घेतल्या आणि यूएईचे कंबरडे मोडले. प्रत्युत्तरादाखल भारताने केवळ ४.३ षटकांत सामना आपल्या नावावर केला. भारताकडून अभिषेक शर्माने ३० आणि शुभमन गिलने २० धावा केल्या.