यासीम मोर्तझा आणि लिटन दास (फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh vs Hong Kong : आशिया कप २०२५ स्पर्धेला ९ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यातील सामन्याने सुरवात झाली यामध्ये अफगाणिस्तान संघाने विजय मिळवला, तर दूसरा सामन्यात भारताने यूएईला पराभूत केले. आशिया कपमध्ये दोन सामने खेळवण्यात आले आहेत. आज तिसरा सामना हाँगकाँग आणि बांगलादेश यांच्यात अबू धाबी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. सामान्यापूर्वी बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हाँगकाँग संघ प्रथम फलंदाजी करणार आहे.
हाँगकाँग संघाला आशिया कपच्या सलामी सामन्यात याआधी अफगाणिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यामुळे त्यांना हा सामना जिंकणे खुप महत्वाचे असणार आहे, तर लिटन दासच्या नेतृत्वाखालील बांगलादेश संघ या स्पर्धेची विजयी सुरवात करण्यास प्रयत्नशील असणार आहे. यासीम मोर्तझाकडे धुरा असणाऱ्या हाँगकाँग संघासमोर घातकी समजल्या जाणाऱ्या बांगलादेशचे कठीण आव्हान असणार आहे.
अबू धाबी स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी समान आहे. आशिया कप २०२५ च्या सुरुवातीच्या सामन्यात येथे धावा देखील झाल्या आणि विकेट देखील पडल्या. अफगाणिस्तानने हाँगकाँगविरुद्ध पहिल्या सामन्यात १८९ धावांचे लक्ष्य उभे केले होते. तथापि, दुसऱ्या डावात लवकर दव पडल्यामुळे गोलंदाजांना चेंडू पकडण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या.
बांगलादेश संघ खालीलप्रमाणे
लिटन दास (कर्णधार), तनजीद हसन तमीम, परवेझ हुसैन इमोन, सैफ हसन, तौहीद ह्रदोय, जाकेर अली अनिक, शमीम हुसेन, नुरुल हसन सोहन, शाक महेदी हसन, रिशाद हुसेन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तन्झिम हसन साकीब, मोहम्मद साकिब, मोहम्मद साकीब, मोहम्मद हसन.
हेही वाचा : मोठी बातमी! IND VS PAK सामन्यावर बहिष्कार? माजी क्रिकेटपटूने थोपटले दंड; म्हणाला, ‘सामना पाहणार नाही..
हाँगकाँग संघ खालीलप्रमाणे
यासीम मोर्तझा (कर्णधार), बाबर हयात (उपकर्णधार), झीशान अली, नियाझाकत खान मोहम्मद, नसरुल्ला राणा, मार्टिन कोएत्झी, अंशुमन रथ, कल्हान मार्क छल्लू, आयुष आशिष शुक्ला, मोहम्मद एजाज खान, अतीक उल रहमान इक्बाल, किंचित शाह, आदिल महमूद, हारून मोहम्मद, हारून मोहम्मद, हारून शाह, मोहम्मद गझल, अरविंद गौतम, मोहम्मद गझल. मोहम्मद वहीद, अनस खान आणि एहसान खान.