सूर्यकुमार यादव आणि सौरभ भारद्वाज(फोटो-सोशल मीडिया)
सोमवारी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सौरभ भारद्वाज म्हणाले की, “सूर्यकुमार यादव, जर तुमच्यात हिंमत असेल आणि जर तुमच्या बीसीसीआय आणि आयसीसीमध्ये हिंमत असेल तर तुम्ही त्यांच्या प्रसारण मार्गातून आणि या संपूर्ण व्यवसायातून जे पैसे कमावले आहेत ते शहीदांच्या विधवांना द्या. आम्ही देखील मान्य करू.”
सौरभ भारद्वाज म्हणाले की, “त्यांच्यात हिंमत नाही. आम्ही त्यांना विजय समर्पित केले आहे असे देखील खोटे बोला, हा सामना दिल्लीमधील कोणत्याही सोसायटी आणि आरडब्ल्यूएमध्ये प्रसारित करण्यात आला नाही. दिल्लीतील सर्व क्लब आणि रेस्टॉरंट्सकडून हा सामना कुठे दाखवण्यात आला नाही.”
विजयानंतर भारतीय संघाने पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करणे टाळले, यावरून देखील भारद्वाज यांनी सूर्यकुमार यादववर टीका केली. ते म्हणाले की “सामना संपताच भाजपचे लोक बोलू लागले की, भारतीय संघाच्या कर्णधाराकडून पाकिस्तानी संघाशी हस्तांदोलन करण्यात आले नाही. असे करून त्याने देशावर मोठे उपकार केले आहेत.”
भारद्वाज पुढे म्हणाले की, “काल भारतीय संघाच्या विजयानंतर देखील दिल्लीतील लोकांकडून फटाके न फोडता भाजप सरकारला मोठा संदेश देण्यात आला आहे. देशात सगळीकडे विरोध असून देखील भाजप सरकारने भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्यात आला, परंतु तिकिटे खरेदी करूनही अनेक भारतीय सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये हजर राहिले नाहीत.”
हेही वाचा : IND VS PAK : ‘आमचा पराभव, आम्ही कर भरू’, भारताकडून पराभूत पाकिस्तानी तज्ज्ञ बरळला, अमेरिकेला बनवले बाप..
सौरभ भारद्वाज पुढे असे देखील म्हणाले की “दुबईमध्ये खेळवण्यात आलेल्या या सामन्यावर बहिष्कार टाकून जनतेने केंद्र सरकारला चुकीचे काम करत असल्याचा देखील संदेश दिला.” आता या मुद्द्यावरील वाद आणखी तीव्र होण्याची शक्यता दिसून येत आहे.






