फोटो सौजन्य - बीसीसीआय
भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप २०२५ चा सहावा सामना रविवार, १४ सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. मागील अनेक महिन्यापासून चर्चेत असलेला सामना आता काही तासामध्ये सुरु होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये झालेल्या वादानंतर आता भारताचा संघ पहिल्यांदाच पाकिस्तानविरुद्ध सामना खेळणार आहे. हा सामना 14 तारखेला म्हणजेच उद्या होणार आहे. भारत-पाकिस्तान दोन्ही संघांनी आपला पहिला सामना खेळला आहे.
भारताने आपल्या पहिल्या सामन्यात यूएईचा पराभव केला तर पाकिस्तानने ओमानचा पराभव केला. भारत विरुद्ध पाकिस्तान सामना जिंकणारा संघ सुपर-४ कडे वाटचाल करेल, तर पुढचा सामना पराभूत संघासाठी महत्त्वाचा ठरेल. भारतीय संघ जसप्रीत बुमराहच्या रूपात फक्त एकच वेगवान गोलंदाज घेऊन यूएईविरुद्ध आला होता, त्यामुळे अर्शदीप सिंग पाकिस्तानविरुद्ध प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रवेश करू शकतो याची पूर्ण शक्यता आहे. अशा परिस्थितीत, कोणाला वगळले जाईल ते जाणून घेऊया –
सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर या जोडीने युएईविरुद्धच्या सामन्यात कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती हे तीन फिरकीपटू मैदानात उतरवले होते. कुलदीप यादवने अशी कामगिरी केली की आता कोणीही त्याला वगळण्याचा विचारही करू शकत नाही. युएईविरुद्ध त्याने चार विकेट घेतल्या. पहिल्या सामन्यामध्ये अर्शदीपला खेळण्याची संधी मिळाली नाही, त्यामुळे आता प्लेइंग 11 मध्ये दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
The RIVALRY of all rivalries 🇮🇳🇵🇰
The GREATEST CLASH in cricket 🔥𝐈𝐍𝐃𝐈𝐀 𝐯𝐬 𝐏𝐀𝐊𝐈𝐒𝐓𝐀𝐍 – tomorrow, 7 PM onwards, LIVE on the Sony Sports Network TV channels & Sony LIV.#SonySportsNetwork #DPWorldAsiaCup2025 #INDvPAK pic.twitter.com/BGqNeg33It
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 13, 2025
अशा परिस्थितीत, अर्शदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये बसवण्यासाठी अक्षर पटेल किंवा वरुण चक्रवर्ती यापैकी एकाला वगळावे लागू शकते. अक्षर पटेल खालच्या फळीत फलंदाजी करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकतो, त्याच्या फलंदाजीच्या क्षमतेची सर्वांनाच जाणीव आहे. अशा परिस्थितीत वरुण चक्रवर्तीला अंतिम अकरामधून वगळण्याची शक्यता जास्त असल्याचे दिसते. जर संघ व्यवस्थापनाने अक्षर पटेलला बाहेर ठेवले तर भारतीय फलंदाजीत फारशी खोली राहणार नाही, अशा परिस्थितीत फलंदाजांवर अधिक दबाव येईल.
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल/वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह