बॉलीवूड आणि मराठी सिनेमाचा वाद हा कायमच सुरु असलेला विषय आहे. महाराष्ट्रात मराठी सिनेमांना थिएटर मिळत नाही ही बाब अत्यंत चुकीची आहे. त्यामुळे नवी मुंबईत मराठीला दुय्यम स्थान दिल्याप्रकरणी मनसे चित्रपट सेनेचा राडा घातला.आज महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नवी मुंबई च्या वतीने वाशी, पाम बीच गॅलरिया मॉलमधील PVR INOX येथे शिष्टमंडळाने भेट दिली आहे.
मराठी भाषेला दिलेल्या दुय्यम स्थानाबाबत आम्ही त्यांच्या व्यवस्थापनाला जाब विचारला. Movie Jockey ह्या चॅटबॉट संबंधित जाहिरात फलकावर इतर भाषांच्या पर्यायाचा उल्लेख पण मराठी भाषेचा अभाव, आणि वास्तवामध्ये त्या चॅटबॉट मधे मराठी भाषेचा पर्यायाला शेवटच्या क्रमांकावर ठेवणे, तसेच त्यांच्या अधिकृत ॲप्लिकेशनमध्ये देखील मराठी भाषा पर्याय नसणे – या सर्व बाबींवर आम्ही कठोर आक्षेप नोंदवला.
यावेळी व्यवस्थापनाने तात्काळ संबंधित इंग्रजी जाहिरात फलक काढून टाकला आणि सर्व मराठी चित्रपटांचे जाहिरात फलक मुख्य दालनात लावले. तसेच भविष्यात मराठी भाषेला योग्य प्राधान्य दिले जाईल, याची खात्री दिली. तसेच योग्य ते बदल करून घेण्याचे आश्वासन दिले. यासोबतच मराठी भाषेचा झालेला अपमान लक्षात घेऊन महाराष्ट्र, मराठी जन आणि आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांची दिलगिरी व्यक्त केली.
किरण विजया मनोहर सावंत ( मा संघटक- मनसे चित्रपट सेना, नवी मुंबई) , अनिकेत जयवंत पाटील (संघटक- मनसे चित्रपट सेना, नवी मुंबई) , सागर विचारे (मनसे, वाशी विभाग अध्यक्ष), अभिलेश दंडवते(मनसे, वाशी विभाग अध्यक्ष), श्याम ढमाले(मनसे, वाशी विभाग अध्यक्ष), अमोल काळडोके (मनसे, शाखा अध्यक्ष) आणि मनसे चित्रपट सेनेचे अन्य पदाधिकारी जसे स्वप्नील यादव, महादेव डोंगरे, संगपाल गायकवाड, स्वप्नेश म्हात्रे, रोनित पांगरकर, महेश मस्कर, अंकेश कोळी, संदीप कांबळे, ओंकार मस्कर, गौरव यादव, मनीष बेनेरे आणि अन्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.