लहान मुलांची हाडे राहतील कायमच मजबूत! बाळासाठी झटपट घरी तयार करा नाचणीची खीर
लहान मुलं जन्माला आल्यानंतर त्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य कायमच निरोगी राहण्यासाठी बाळाची खूप जास्त काळजी घेतली जाते. बाळ ५ किंवा ६ महिन्याचे झाल्यानंतर बाळा आहारात वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. जन्माला आल्यानंतर बाळाला आईचे दूध दिले जाते. आईच्या दुधावर बाळाच्या शरीराचा विकास होतो. त्यानंतर बाळाला बेबी फूड्स, सॅरेलॅक्स किंवा इतर घरगुती पदार्थांचा वापर करून बनवलेल्या पेज किंवा भरडी खाण्यास दिल्या जातात. बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम मानला जाणारा पदार्थ म्हणजे नाचणीचे सत्व. नाचणीमध्ये असलेले गुणधर्म शरीरासाठी अतिशय गुणकारी ठरतात. त्यामुळे आहारात सुद्धा नाचणीच्या भाकरीचे किंवा नाचणीपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास दिले जाते. नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह, प्रोटीन आणि फायबर इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. नाचणीचे सत्व सहज पचन होते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बाळासाठी सोप्या पद्धतीमध्ये नाचणी सत्व बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)
पानी कम चाय, बन मस्का कप केक अन् खारी; इराण्यांकडचे सारेच पदार्थ भारी