भारतीय महिला संघ(फोटो-सोशल मीडिया)
Reaction from Indian women’s team head coach Amol Mazumdar : भारतीय महिला संघ आयसीसी विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियासोबत तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. आयसीसी विश्वचषकाला ३० सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी भारतीय महिला संघाची ऑस्ट्रेलियासोबतची एकदिवसीय मालिका ही एक अग्नि परीक्षा असणार आहे, असे मत भारतीय महिला संघाचे प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी मांडले आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी मालिकेबाबत मत मांडताना म्हटले आहे आहे की, भारतीय संघासाठी ही मालिका ‘कठीण परीक्षा’ असणार याहे.त्यामुळे संघ ३० सप्टेंबरपासून गुवाहाटी येथे सुरू होणाऱ्या महिला विश्वचषकासाठी तयारी करत असल्याचे म्हटले आहे. १४ सप्टेंबरपासून भारत ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. त्यानंतर पुढील सामने १७ आणि २० सप्टेंबर रोजी खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा : BAN vs SL Pitch Report : आज अबू धाबीच्या खेळपट्टीची स्थिती कशी असेल, फायदा कोणाला मिळणार? जाणून घ्या
मुख्य प्रशिक्षक मजुमदार यांनी एका ऑनलाइन पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, “मला वाटते की ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका ही विश्वचषकासाठी एक उत्तम तयारी असणार आहे. ही आमच्यासाठी खूप महत्त्वाची मालिका असून आम्ही जगातील एका अव्वल संघाविरुद्ध खेळण्याची आतुरतेने वाट पाहत आहोत. आमचा इंग्लंड दौरा उत्तम राहिला आहे, आम्हाला हवे असलेले सकारात्मक निकाल देखील आम्हाला मिळाले आहेत.”
मजुमदार पुढे म्हणाले की, “आम्हाला इंग्लंडमध्ये चांगले निकाल मिळाले आहेत, एकदिवसीय भारताने सामन्यात २-१ असा विजय मिळवला आणि आम्ही टी-२० मालिका देखील जिंकली. हा एक उत्तम सांघिक प्रयत्न राहिला आहे. संघातील स्मृती मानधनाने ट्रेंट ब्रिजमध्ये शतक ठोकले तर हरमन (हरमनप्रीत कौर) ने डरहममध्ये शतक झळकावले होते. सर्वांकडून योगदान देण्यात आले आणि हीच या मालिकेतील सर्वोत्तम बाब राहिली होती. राधा यादवने महत्त्वाची भूमिका पार पडली, तर क्रांती गौरने देखील महत्वाचे योगदान दिले.”
मुजुमदार म्हणाले की, “विश्वचषक जिंकण्यासाठी यशासाठी संघाला सामूहिक प्रयत्न करावे लागणार आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारत विश्वचषकाची तयारी करण्यासाठी मिळणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घेणार आहे. तयारी सारखीच असणार असली तरी गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलिया एक प्रभावी संघ राहिला आहे, परंतु आम्ही आमच्या तयारीवर आणि ती कशी अंमलात आणतो यावर लक्ष केंद्रित करत आहोत. करतो.