
Team India accommodation in japan
२०२६ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीच्या भारतीय संघाच्या निरोप समारंभादरम्यान, बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या राहण्याच्या व्यवस्थेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले. एका वृत्तसंस्थेशी बोलताना शुक्ला यांनी सांगितले की, भारतीय क्रिकेटपटू आयोजकांनी निश्चित केलेल्या निवासस्थानांमध्येच राहतील. बीसीसीआय आणि खेळाडू सध्याच्या सुविधांवर समाधानी आहेत आणि त्यामुळे, कोणत्याही वेगळ्या हॉटेलची व्यवस्था केली जाणार नाही.
ते पुढे म्हणाले की, ‘आयोजकांनी खेळांडूसाठी जिथे राहण्याची सोय केली आहे, खेळाडू तिथेच राहतील. खेळाडू कोणत्या हॉटेल्समध्ये राहणार यावर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. ती फाईन्ह स्टार हॉटेल्स नाहीत, पण ती चांगली हॉटेल्स आहेत. आम्ही हॉटेल्सचे फोटो आणि व्हिडिओ पाहिले आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे की ती आरामदायक असतील. खेळाडू याच हॉटेलमध्ये राहतील, कारण त्यांच्याकडे ओसाका किंवा टोकियोमध्ये राहण्याचा पर्याय होता, जी ठिकाणे खूप दूर आहेत.’ बीसीसीआयच्या उपाध्यक्षांनी पुढे सांगितले की, ‘भारतीय क्रिकेटपटू शेअरिंग रुममध्ये राहणार नाहीत; ते स्वतंत्र रुममध्ये राहतील.’
🔴INDIAN MEN’S TEAM TO STAY ON A CRUISE🤯 BCCI is not happy with Cricketers Sharing Rooms in Asian games. – BCCI has appealed to IOA not to put two players in one room. – Men’s team will stay on a cruise ship, while the Women’s team will stay in a hotel. – IOA has not… pic.twitter.com/ExuECGNZOH — Sam (@cricsam02) September 4, 2026
भारतीय पुरुष क्रिकेट संघ २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी २० सप्टेंबर रोजी टोकियोला रवाना होईल, जिथे २२ सप्टेंबर रोजी भारत आणि जपान यांच्यात एक ऐतिहासिक टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. यानंतर, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २८ सप्टेंबर रोजी आशियाई खेळांमधील आपला पहिला सामना खेळेल, जो उपांत्यपूर्व फेरीचा सामना असेल.
श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवि बिश्नोई, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग.
Asian Games 2026: ‘Back to Blues’! भगव्या रंगावरून वादानंतर मोठा निर्णय! भारतीय हॉकी संघ आता थेट…