Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट

दिवसातील दुसऱ्या लढतीत 'आयडियाज अ सास कंपनी' संघाने 'अॅक्सेन्चर' संघावर २-० अशी मात केली. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला केविन घाडगे याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 29, 2026 | 08:01 PM
Inter-IT Football: ११-० चा धमाका! सायबेजच्या खेळाडूंचा मैदानात धुमाकूळ, डिलॉइट भुईसपाट
Follow Us
Follow Us:
  • सायबेजचा डिलॉइटवर ११-० गोलने दणदणीत विजय
  • सत्यजीत आणि सॅमसनच्या हॅटट्रिकने सामना गाजवला
  • आयडियाज आणि झेडएस असोसिएट्सचेही महत्त्वपूर्ण विजय
पुणे: एयू स्मॉल फायनान्स बँक प्रस्तुत १६ व्या आंतर आयटी फुटबॉल चॅम्पियनशिप कप २०२६ या प्रतिष्ठित स्पर्धेत साखळी फेरीत सायबेज संघाने आपला दबदबा कायम ठेवत डिलॉइट संघाचा ११-० असा धुव्वा उडवला. खराडी येथील टॉपप्ले फुटबॉल ग्राउंडवर सुरू असलेल्या या स्पर्धेत सायबेजच्या खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत प्रतिस्पर्ध्यांना सावरण्याची एकही संधी दिली नाही.

सायबेज संघाच्या विजयात सत्यजीत लुगडे आणि सॅमसन जोसेफ हे चमकले. सत्यजीत लुगडे याने ५ व्या, १२ व्या आणि ४० व्या मिनिटाला गोल नोंदवत आपली हॅटट्रिक साजरी केली. तर सॅमसन जोसेफ याने ३७ व्या, ४१ व्या आणि ४९ व्या मिनिटाला सुरेख गोल करत हॅटट्रिक पूर्ण केली. या दोघांव्यतिरिक्त वीरेंद्र पिल्ले (१५ व २८ मि.), हमझा शहा (२५ मि.), मनीष बिशोई (२७ मि.) आणि श्रेयस धोढरे (३७ मि.) यांनी प्रतिस्पर्धी संघाचे जाळे भेदत गोलांचा पाऊस पाडला. डिलॉइट संघाला संपूर्ण सामन्यात एकही गोल नोंदवता आला नाही.

विराट कोहलीची RCB सुपरहिट! विक्रमी ब्रँड व्हॅल्यूने क्रिकेटविश्वात रचला जागतिक इतिहास

आयडियाज अ सास कंपनीची विजयकुच

दिवसातील दुसऱ्या लढतीत ‘आयडियाज अ सास कंपनी’ संघाने ‘अॅक्सेन्चर’ संघावर २-० अशी मात केली. सामन्याच्या १२ व्या मिनिटाला केविन घाडगे याने पहिला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली, तर २३ व्या मिनिटाला क्षितिज जाधव याने दुसरा गोल करत संघाचा विजय सुकर केला. अन्य एका संघर्षाने भरलेल्या सामन्यात ‘झेडएस असोसिएट्स’ संघाने ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ संघाचा २-१ असा पराभव केला. झेडएस असोसिएट्सकडून सौरव नाथ याने २५ व्या मिनिटाला आणि यशवर्धन टी. याने ३८ व्या मिनिटाला गोल केले. पराभूत टीसीएस संघाकडून महेश अमनगी याने ४२ व्या मिनिटाला एक गोल करून प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपुरा पडला.अखेरची साखळी फेरी शिल्लक असताना सध्या गुणतालिकेत ७ गुणांसह ‘आयडियाज अ सास कंपनी’ संघ अव्वल स्थानी विराजमान आहे. ५ गुणांसह ‘झेडएस असोसिएट्स’ संघ दुसऱ्या स्थानी तर ४ गुणांसह ‘सायबेज’ संघ तिसऱ्या स्थानी आहे.

 सामन्यांचे संक्षिप्त निकाल (साखळी फेरी):
सायबेज: ११ (सत्यजीत लुगडे ५, १२, ४० मि.; सॅमसन जोसेफ ३७, ४१, ४९ मि.; वीरेंद्र पिल्ले १५, २८ मि.; हमझा शहा २५ मि.; मनीष बिशोई २७ मि.; श्रेयस धोढरे ३७ मि.) विजयी विरुद्ध डिलॉइट: ०

भाकरी फिरवावी लागणार! Vaibhav Suryavanshi खेळणार 2027 चा वर्ल्डकप? मकरंद वायंगणकरांचा सल्ला चर्चेत

आयडियाज अ सास कंपनी: २ (केविन घाडगे १२ मि.; क्षितिज जाधव २३ मि.) विजयी विरुद्ध अॅक्सेन्चर: ०

 झेडएस असोसिएट्स: २ (सौरव नाथ २५ मि.; यशवर्धन टी ३८ मि.) विजयी विरुद्ध टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस: १ (महेश अमनगी ४२ मि.)

Web Title: Au small finance bank presents inter it football championship sybgen victory over deloitte pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 08:01 PM

Topics:  

  • Football Match
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती
1

पेठांतील गर्दीवर ३०० ‘एआय’ कॅमेऱ्यांचा वॉच! संशयितांची ओळख, गर्दीची मोजणी अन् आग-धुराचीही मिळणार माहिती

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले
2

शेतकरी आत्महत्या करतोय अन्…; दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदामावरून अंबादास दानवे संतापले

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला
3

म्हाडाच्या घरांसाठी पुन्हा संधी; 4462 सदनिकांसाठी अर्जाची मुदत वाढली, आता सोडत 26 नोव्हेंबरला

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित
4

कलाकारांना कौतुकाची थाप आवश्यक, हेमा मालिनी यांचे प्रतिपादन; ‘सुरेश कलमाडी जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.