विराट कोहली आणि आर्यन शर्मा(फोटो-सोशल मीडिया)
AUS U19 vs IND U19 : भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघांमध्ये तीन सामन्यांची युवा एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून आर्यन शर्मा नावाचा खेळाडू खेळताना दिसत आहे. हा खेळाडू ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू असून त्याचे नाव सध्या चांगलेच चर्चेत आहे. काही वर्षांपूर्वी आर्यन शर्मा या युवा खेळाडूने विराट कोहलीला २०२५ पर्यंत ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळवून देण्याचे वचन देण्यात आले होते. अखेर आर्यन शर्माकडून विराट कोहलीला दिलेले वचन पूर्ण करण्यात आले आहे. आर्यन शर्मा कोण आहे? आणि या खेळाडूचे विराटसोबत काय नाते आहे? हे आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : IND vs PAK : पाकिस्तानने लाजच सोडली! भारताकडून पराभव जिव्हारी; पंचांना टार्गेट केल्याने नव्या वादाला जन्म
आर्यन शर्मा हा खेळाडू ऑस्ट्रेलियाच्या १९ वर्षांखालील संघाचा एक महत्वाचा भाग आहे. त्याने २१ सप्टेंबर रोजी भारताविरुद्ध पदार्पण केले आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याला मात्र आपली छाप पाडता आलेली नाही. त्याने फलंदाजीमध्ये केवळ १० धावाच केल्या आहेत. तर गोलंदाजीत देखील त्याला मिळवता आले नाही. त्याच्या संघाला पहिला युवा एकदिवसीय सामना गमवावा लागला. परंतु आर्यन शर्माने मात्र चांगलीच प्रसिद्धी मिळवली.
७ वर्षांच्या फोटोमुळे तो चर्चेत आला आहे. २०१८ मध्ये, जेव्हा विराट कोहली टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता, तेव्हा आर्यन शर्मा त्यांचा सामना पाहण्यासाठी मैदनावर आला होता. तो त्याच्यासोबत एक बोर्ड देखील घेऊन आला होता, ज्यावर लिहिलेले होते, “विराट, तू माझी प्रेरणा आहेस. मला २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाकडून खेळताना पहा.” सात वर्षांनंतर, खेळाडूने त्याचे वाचनाची पूर्ती केली आहे. आता, त्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
आर्यन शर्मा हा केवळ १७ वर्षांचा एक खेळाडू आहे. तो एक अष्टपैलू खेळाडू असून उजव्या हाताचा फलंदाज असण्याबरोबरच तो मध्यम गतीने गोलंदाजी देखील करतो. ऑस्ट्रेलियाने भारताच्या १९ वर्षांखालील संघाविरुद्धचा पहिला सामना सात विकेट्सने गमावला. प्रथम फलंदाजी करताना, ऑस्ट्रेलियन १९ वर्षांखालील संघ फक्त २२५ धावाच करू शकला. जॉन जेम्सने नाबाद ७७ धावा केल्या. तर आर्यनने फक्त १० धावा काढून माघारी गेला. प्रत्युत्तरात, भारतीय संघाने फक्त १८३ चेंडूत लक्ष्य पूर्ण केले.