Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AUS vs BAN: ‘आँधी बनके आया हूँ…’ स्टार्कच्या झंझावातात बांग्लादेशचा उडाला धुरळा, 34 षटकात गुंडाळला गाशा

AUS vs BAN: ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेशमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात मिचेल स्टार्कने संपूर्ण टीमला नेस्तनाबूत केले. पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला नमवणाऱ्या बांग्लादेशची संपूर्ण हवाच काढली

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 22, 2026 | 11:44 AM
मिचेल स्टार्कने बांग्लादेशींचे कंबरडे मोडले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

मिचेल स्टार्कने बांग्लादेशींचे कंबरडे मोडले (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • मिचेल स्टार्कने बांग्लादेशच्या टीमची संपूर्ण हवाच काढली
  • १०० धावांपर्यंतही पोहचू शकले नाहीत खेळाडू 
  • १२ धावांमध्ये ६ खेळाडूंना पाठवले तंबूत 
AUS vs BAN: डार्विनमधील कसोटीतील पराभवाचा राग ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी बांगलादेशच्या पहिल्या डावात केवळ ७० धावांवर बाद करून काढला. मॅके येथील कसोटी सामन्याच्या पहिल्याच चेंडूपासून मिचेल स्टार्कने बांगलादेशी फलंदाजांची धुलाई केली. बांग्लादेशाच्या एकाही खेळाडूला त्याने डोकं वर काढू दिलं नाही. 

नव्या चेंडूने धुमाकूळ घालण्यात पटाईत असलेल्या स्टार्कने पहिल्याच चेंडूवर बळी घेतला आणि बांगलादेशच्या अर्ध्या संघाला झटपट बाद केले. स्टार्कच्या ५ बळींमुळे बांगलादेशने केवळ १२ धावांत पाच गडी गमावले. कर्णधार पॅट कमिन्सनेही ऑस्ट्रेलियाच्या स्फोटक सुरुवातीचा फायदा उचलत तीन बळी घेतले आणि बांगलादेशला केवळ ६४ धावांवर गुंडाळले. जोश हेझलवूडने एक बळी घेतला. स्टार्कचे एकूण सहा बळी होते.

THE AUSTRALIAN BOWLERS IN FIRST INNINGS: – 6/12 in 10 overs from Starc.
– 3/25 in 10 overs from Cummins.
– 1/18 in 11 overs from Hazlewood.
The terrific bowling performance from Australia vs Bangladesh 🇦🇺 pic.twitter.com/dBCn6fT0wL — Maina Singh (@Maina_Singhx77) August 22, 2026

AUS Vs BAN: महाखळबळ! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश अडचणीत? ‘या’ खेळाडूंच्या खेळण्यावर टांगती तलवार

बांग्लादेशची सर्वात कमी कसोटी धावसंख्या

ही बांगलादेशची चौथी सर्वात कमी कसोटी धावसंख्या आहे. यापूर्वी, २००७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध बांगलादेशचा संघ ६२ धावांवर सर्वबाद झाला होता. ५३ धावा ही बांगलादेशची दुसरी सर्वात कमी धावसंख्या आहे, जी २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नोंदवली गेली होती. दरम्यान, २०१८ मध्ये वेस्ट इंडिजने बांगलादेशला त्यांच्या सर्वात कमी धावसंख्येवर गुंडाळले होते. बांगलादेशचा संघ केवळ ४३ धावांवर सर्वबाद झाला होता.

स्टार्कचा कहर

साउथ मॅके येथील ग्रेट बॅरियर रीफ एरिनामध्ये सुरू झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्कने पहिल्या काही षटकांमध्येच कर्णधार पॅट कमिन्सचा निर्णय योग्य ठरवला. स्टार्क आणि इतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या गोलंदाजीने डार्विन कसोटीतील पराभवाचा बदला घेतल्याचे दिसत होते. स्टार्कच्या वेग, उसळी आणि स्विंगसमोर बांगलादेशची आघाडीची फळी हतबल दिसत होती. स्टार्कच्या स्फोटक गोलंदाजीने बांगलादेशच्या आघाडीच्या फळीला उद्ध्वस्त केले.

WTC Points: तब्बल 30 लाखांचा दंड आणि WTC पॉईंटमध्येही घट, बांग्लादेशकडून पराभवानंतर ऑस्ट्रेलियावर नामुष्की

बांगलादेशचा संघ ३४ षटकांत सर्वबाद झाला

बांगलादेशने १५ धावांत आपले पहिले पाच बळी गमावले, ज्यात स्टार्कने सर्व बळी घेतले. मिराज (११), हसन महमूद (१०), तैजुल इस्लाम (११) आणि शोरिफुल इस्लाम (१४) यांच्यामुळे बांगलादेशने कसाबसा ५० धावांचा टप्पा ओलांडून ६४ धावा केल्या. चार फलंदाज शून्यावर बाद झाले आणि सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. शेवटचा फलंदाज शोरिफुल इस्लाम हा डावातील सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. बांगलादेशचा डाव ३४ षटकांपर्यंतच मर्यादित राहिला. ऑस्ट्रेलियाकडून, मिचेल स्टार्कने १० षटकांत १२ धावा देऊन ६ बळी घेतले. कर्णधार पॅट कमिन्सने १० षटकांत २५ धावा देऊन ३ बळी घेतले आणि जोश हेझलवूडने १ बळी घेतला.

Web Title: Aus vs ban bangladesh all out on fourth lowest total in test cricket mitchell starc created history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • australia vs bangladesh
  • cricket news
  • Sports News
  • Test cricket

संबंधित बातम्या

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय
1

Cricket: अजित वाडेकर ॲकॅडमीचा जलवा; ‘पुना वेस्टर्न क्लब करंडक‌’मध्ये सलग 2 दणदणीत विजय

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले
2

Cricket: जॉन वाघमारेची भेदक गोलंदाजी; बार्कलेजने एसएस अँड सी ॲडव्हेंटला ४ गडी राखून हरवले

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी
3

Cricket: एक शतक अन् २५७ रन्सचे विजय! युनिटी करंडकात आर्यन्स क्रिकेट अकादमीची शानदार कामगिरी

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming
4

IND vs NZ 2nd T20: किती वाजता सुरू होणार भारत-न्यूझीलंडचे घमासान! कुठे आणि कधी पाहता येईल Live Streaming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.