यूएस ओपनमध्ये '९ सप्टेंबर' चा अनोखा विक्रम(फोटो-सोशल मीडिया)
‘९ सप्टेंबर’ हा दिवस टेनिस जगतासाठी खूप खास राहिला आहे. या दिवसाचे महत्वही मोठे आहे. तीन वेगवेगळ्या वर्षांत या दिवशी यूएस ओपनमध्ये इतिहास लिहिला गेला आहे.
९ सप्टेंबर २००१ हा टेनिस जगतासाठी खूप खास दिवस राहिला होता. या दिवशी व्हीनस विल्यम्स तिची धाकटी बहीण सेरेनाविरुद्ध यूएस ओपनच्या अंतिम फेरीत आमनेसामने होत्या.
हेही वाचा : Asia Cup 2025 चे जेतपद जिंकणारा संघ होणार मालामाल! बक्षीस रकमेत झाली मोठी वाढ
२१ वर्षीय व्हीनस अॅश स्टेडियममध्ये सुमारे २३ हजार लोकांमध्ये जगातील ती नंबर-४ खेळाडू होती. तिची १९ वर्षांची लहान बहीण सेरेना विल्यम्स १९९९ ची विजेती आणि जागतिक क्रमवारीत १० व्या स्थानावर विराजमान होती. यूएस ओपनच्या अंतिम फेरीत दोन कृष्णवर्णीय महिला समोरासमोर येण्याचा हा तसा पाहिलाच योग होता. ११७ वर्षांनंतर दोन बहिणींमध्ये पहिला ग्रँड स्लॅम फायनल खेळवण्यात येत होता. ज्यामध्ये व्हीनसने ६-२, ६-४ असा विजय संपादन केला होता. दोन वेळा यूएस ओपनचे विजेतेपद जिंकणाऱ्या व्हीनसने एकूण सात ग्रँड स्लॅम एकेरी जेतेपदे आपल्या नावे केली आहेत.
९ सप्टेंबर १९९९ मध्ये, खेळवण्यात आलेल्या यूएस ओपनच्या फायनलमध्ये महेश भूपती आणि जपानच्या आर्च सुगियामा यांच्या जोडीने मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम सामन्यात, दुसऱ्या मानांकित भूपती-सुगियामा यांनी किम्बर्ली पो आणि डोनाल्ड जॉन्सन या अमेरिकन जोडीचा ६-४, ६-४ असा दणदणीत पराभव केला होता. हा सामना १ तास २० मिनिटे इतका वेळ चालला होता.
हेही वाचा : IND vs UAE : टीम इंडियाच्या सराव सत्रात झालं स्पष्ट, हे 4 खेळाडू प्लेइंग 11 मधून वगळणार! कोणाला मिळणार संधी
यापूर्वी, महेश भूपतीने १९९७ मध्ये फ्रेंच ओपनमध्ये भारतासाठी पहिले ग्रँड स्लॅमवर नाव कोरले होते. त्यानंतर भूपती यूएस ओपन जिंकणारा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला होता.
२००२ मध्ये आजच्याच ९ दिवशी, पीट सॅम्प्रासने आंद्रे अगासीला ६-३, ६-४, ५-७, ६-४ अशी धूळ चारून यूएस ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले होते. हे सॅम्प्रासचे पाचवे यूएस ओपन जेतेपद ठरले होते.






