
AUS VS SA Test Series
या सामन्यात पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 124 वर 6 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र शेवटच्या फळीतील फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा सर्वात मोठा शिलेदार मॅट रेनशॉ ठरला. एका बाजूने विकेट्स जात असताना रेनशॉने एकाकी झुंज देत अत्यंत जबाबदारीने फलंदाजी केली आणि १९० धावांची मॅच-विनिंग खेळी केली. मात्र केवळ 10 रन्समुळे त्याचे दुहेरी शतक हुकले.
चाहत्यांनो जरा सांभाळून…! कसोटी क्रिकेटमध्ये क्रांती होणार? ICC थेट WTC च्या फॉर्मटमध्ये ‘हा’…
मॅट रेनशॉने ऑस्ट्रेलियसाठी चांगली खेळी केली. पॅट कमिंस याच्यासोबत त्याने ८३ रन्सची महत्त्वाची भागीदारी केली. नाथन लियोन याच्यासह १23 रन्सची भागीदारी त्याने रचली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ एका मजबूत स्थितीत पोहोचला. फलंदाजांच्या या जिद्दी खेळीनंतर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनीही सामन्यात कमालीची पकड ठेवली आणि दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना मोठी कामगिरी करून दिली नाही.
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने चांगली फलंदाजी केली. रेनशॉने पुन्हा एकदा 82 रन्सची महत्वाची खेळी केली. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स गमावून 314 रन्सवर डाव घोषित केला. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला 421 रन्सचे टार्गेट दिले होते. हे टार्गेट पूर्ण करणे दक्षिण आफ्रिकेला अवघड गेले आणि ऑस्ट्रेलियाने सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दणदणीत विजयानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये ऑस्ट्रेलियाने मोठी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियन संघाने या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. तर भारतीय संघ पाचव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया संघ WTC २०२५-२७ च्या पॉईंट्स टेबलमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये तब्बल ९ विजय मिळवले असून, त्यांचा अंक प्रतिशत (PCT) ८१.८२ इतका मजबूत झाला आहे. दुसरीकडे, भारतीय संघ ५१.५२% पॉईंट्ससह पाचव्या क्रमांकावर आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या ११ सामन्यांमध्ये ६८ पॉईंट्स मिळवले आहेत.
WTC Point Table: श्रीलंकेचा खात्मा निश्चित! मैदान गाजवल्यावर WTC पॉईंट्सचे समीकरण कसे ठरणार