Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंने T20 क्रिकेटला केला रामराम! मिचेल स्टार्कने अचानक का दिला निरोप? स्वतःनेच सांगितले कारण

मिचेल स्टार्कने आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती.आता अचानक टी-२० क्रिकेटमधून निरोप घेऊन सर्वच चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 02, 2025 | 09:51 AM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

Mitchell Starc retirement : मिचेल स्टार्कने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. २०१२ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्वात लहान स्वरूपात पदार्पण केले. आता १३ वर्षांनंतर त्याने निरोप घेतला आहे. मिचेल आता निवृत्त होईल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. मिचेल स्टार्कने 2025 मध्ये चांगली कामगिरी केली आहे पण आता अचानक टी-२० क्रिकेटमधून निरोप घेऊन सर्वच चाहत्यांना आश्चर्यचकित केले आहे. मिचेलने आता यामागील कारण सांगितले आहे.

मिचेल स्टार्कने T20 क्रिकेटमधून का घेतली निवृत्ती?

मिशेल स्टार्कने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, तो भारताविरुद्धच्या मालिकेसाठी, एकदिवसीय विश्वचषक आणि अ‍ॅशेससाठी स्वतःला तंदुरुस्त ठेवू इच्छितो. म्हणूनच त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप देणे योग्य मानले. त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘माझे लक्ष आता टीम इंडियाविरुद्धच्या कसोटी दौऱ्यावर, अ‍ॅशेस आणि २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकावर आहे. मला वाटते की हे (टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती) माझ्यासाठी पूर्णपणे तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहण्याचा सर्वोत्तम मार्ग होता. यामुळे गोलंदाजी गटाला टी-२० विश्वचषकापूर्वीच्या सामन्यांसाठी तयारी करण्याची चांगली संधी मिळेल.’

मिचेल स्टार्कने त्याच्या टी-२० कारकीर्दमध्ये धूमाकुळ घातला आहे आणि त्याने त्याच्या गोलंदाजीने अनेक वेळा संघाला विजय मिळवून दिला तो गणना ही ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज खेळाडूंमध्ये केली जाते. तथापि, ऑस्ट्रेलियाकडून खेळताना त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय वेळ २०२१ चा विश्वचषक होता. तो म्हणाला, ‘कसोटी क्रिकेट नेहमीच माझे प्राधान्य राहिले आहे. मी ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या सर्व टी-२० सामन्यांपैकी प्रत्येक मिनिट मला आवडला आहे, विशेषतः २०२१ चा विश्वचषक. आम्ही तो सामना जिंकलो म्हणूनच नाही तर यावेळी आमचा संघ उत्तम होता आणि आम्ही खूप आनंद यावेळी घेतला होता.’

मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी ६५ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. या काळात त्याने गोलंदाजी करताना २३.८१ च्या सरासरीने ७९ विकेट्स घेतल्या आणि त्याची कारकिर्दीतील इकॉनॉमी ७.७४ होती. स्टार्कने एकदा टी-२० मध्ये ४ विकेट्स घेतल्या आहेत. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियन संघाला त्याची उणीव नक्कीच भासेल. तथापि, स्टार्कचा पर्याय शोधण्यासाठी त्यांच्याकडे अजूनही पुरेसा वेळ आहे.

Web Title: Australias legendary players bid farewell to t20 cricket why did mitchell starc suddenly bid farewell

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2025 | 09:50 AM

Topics:  

  • cricket
  • Mitchell Starc
  • Sports
  • T20 cricket

संबंधित बातम्या

IND vs SA 1st T20 : ‘यॉर्कर किंग’चा जागतिक क्रिकेटमध्ये कहर! ‘ही’ कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज  
1

IND vs SA 1st T20 : ‘यॉर्कर किंग’चा जागतिक क्रिकेटमध्ये कहर! ‘ही’ कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज  

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO
2

IND vs SA T20I series : कटकमध्ये तिलक वर्माचा सुपरमॅन शो! चेंडू टोलवला थेट स्टेडियमबाहेर… ; पहा VIDEO

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 
3

IND vs SA T20I series : कटकमध्ये हार्दिक पंड्याने मॅच खेचली! भारताचे दक्षिण आफ्रिकेसमोर 176 धावांचे लक्ष्य 

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! सूर्या आर्मी करणार फलंदाजी 
4

IND vs SA T20I series : दक्षिण आफ्रिकेने TOSS जिंकून घेतला गोलंदाजीचा निर्णय! सूर्या आर्मी करणार फलंदाजी 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.