
BAN Vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा सुपडासाफ; बांग्लादेशने सामना जिंकत मालिकेवर केला कब्जा
बांगलादेशचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका विजय
ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने केली मात
सौम्य सरकारची महत्वाची खेळी
Bangladesh Vs Austrelia: आज बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दूसरा सामना पार पडला. या सामन्यात बांग्लादेशच्या संघाने ऑस्ट्रेलिया संघाचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासोबत बांग्लादेशने 2-0 ने मालिका आपल्या खिशात घातली आहे. दरम्यान सौम्य सरकारने बांग्लादेशकडून सर्वाधिक रन्स केल्या. डीएलएस सिस्टिमने बांग्लादेशचा विजय झाला आहे.
बांग्लादेशची फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने बांग्लादेशला 188 रन्सचे टार्गेट दिले होते. त्या रन्सचा पाठलाग करण्यासाठी तन्झिद हसन तमीम आणि सौम्य सरकारने बांग्लादेशच्या डावाची सुरुवात केली. मात्र तन्झिद हसन तमीम शून्यावर आउट झाला. तर सौम्य सरकारने 42 रन्सची शानदार खेळी केली. नजमुल हुसेन शांतोने देखील 41 रन्सची खेळी केली. लिटन दासने 21 रन्सची खेळी केली. तौहीदने 40 रन्सची खेळी करत बांग्लादेशचा विजयाचा मार्ग सुकर केला.
ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट
दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.
AUS Vs BAN Live: धडाधड कोसळली! ऑस्ट्रेलियाचे तीन फलंदाज शून्यावर आउट; बांग्लादेशचा कहर
मॅथ्यू शॉर्ट, कुपर कोनोली, मॅट रेनशॉ हे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. एकही रन स्कोअरबोर्डवर नसताना ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज आउट झाले. तर कॅमेरून ग्रीन 21 रन्सकरून आउट झाला. अलेक्स कॅरीने 24 रन्स केल्या. मिडल ऑर्डरच्या खेळीमुळे 187 रन्सपर्यन्त मजल मारली आहे. आता बांग्लादेशला जिंकण्यासाठी 188 रन्सची गरज असणार आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात एका भीषण स्वरूपाची झाली. तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी मैदानावर भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घातला.
या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी ७ व्या क्रमांकावर किंवा त्याहून खाली खेळणाऱ्या दोन फलंदाजांनी अर्धशतक खेळी केली आहे. ७ व्या क्रमांकावरील बार्टलेटने ५० आणि त्याच्यासोबत भागीदारी करणाऱ्या लोअर ऑर्डरच्या या लढ्याने ऑस्ट्रेलियाच्या त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा मायकेल बेवन, अँडी बिशेल किंवा शेन वॉर्न यांसारखे खेळाडू तळाला येऊन संघाला संकटातून बाहेर काढत असत.