बांग्लादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाची फलंदाजी ढासळली (फोटो- ians)
ऑस्ट्रेलियाचे सलग तीन फलंदाज शून्यावर आउट
बंगलादेशविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा दूसरा एकदिवसीय सामना
ऑस्ट्रेलियाचे बांग्लादेशला 188 रन्सचे टार्गेट
Bangladesh Vs Austrelia: सध्या ढाका येथे ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात वनडे सिरिज सुरू आहे. पहिल्या सामन्यात बांग्लादेशने सामना जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1-0 अशी आघाडी घेतली होती. मात्र आता दूसरा सामना देखील ऑस्ट्रेलिया हरणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी पूर्णपणे ढेपाळली आहे.
दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय एकदम चुकीचा ठरला, दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने अशाच एका थक्क करणाऱ्या आणि ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे. टॉप ऑर्डरचे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले आहेत. तर दुसऱ्या बाजूला तीन फलंदाज शून्यावर आउट झाले असताना मिडल ऑर्डरच्या फलंदाजांनी शानदार खेळी करत सांनीयचे चित्र बदलून टाकले.
मॅथ्यू शॉर्ट, कुपर कोनोली, मॅट रेनशॉ हे तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. एकही रन स्कोअरबोर्डवर नसताना ऑस्ट्रेलियाचे तीन प्रमुख फलंदाज आउट झाले. तर कॅमेरून ग्रीन 21 रन्सकरून आउट झाला. अलेक्स कॅरीने 24 रन्स केल्या. मिडल ऑर्डरच्या खेळीमुळे 187 रन्सपर्यन्त मजल मारली आहे. आता बांग्लादेशला जिंकण्यासाठी 188 रन्सची गरज असणार आहे. ऑस्ट्रेलियाची सुरुवात एका भीषण स्वरूपाची झाली. तीन फलंदाज शून्यावर आउट झाले. बांग्लादेशच्या गोलंदाजांनी मैदानावर भेदक गोलंदाजीने धुमाकूळ घातला.
BAN Vs AUS: कांगारूंचा अहंकार चक्काचूर! बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय
या सामन्यात अनेक रेकॉर्ड रचले गेले आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियासाठी ७ व्या क्रमांकावर किंवा त्याहून खाली खेळणाऱ्या दोन फलंदाजांनी अर्धशतक खेळी केली आहे. ७ व्या क्रमांकावरील बार्टलेटने ५० आणि त्याच्यासोबत भागीदारी करणाऱ्या लोअर ऑर्डरच्या या लढ्याने ऑस्ट्रेलियाच्या त्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली, जेव्हा मायकेल बेवन, अँडी बिशेल किंवा शेन वॉर्न यांसारखे खेळाडू तळाला येऊन संघाला संकटातून बाहेर काढत असत.
बांगलादेशचा ऑस्ट्रेलियावर 86 धावांनी थरारक विजय
बांगलादेश दौऱ्यावर आलेल्या बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात लाजिरवाणा पराभव स्वीकारावा लागला आहे. मिरपूरच्या शेर-ए-बांगला स्टेडियमवर आजचा सामना झाला. या सामन्यात बांगलादेशने अप्रतिम सांघिक कामगिरीच्या जोरावर डकवर्थ-लुईस (DLS) नियमानुसार ऑस्ट्रेलियाचा 86 रन्सने पराभव केला आहे.
पॅट कमिन्सने विश्वचषकात केला चमत्कार! T20 वर्ल्डकपची पहिली हॅटट्रिक
बांगलादेशने एकदिवसीय क्रिकेटमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला तब्बल २१ वर्षांनंतर पराभूत करण्याचा महापराक्रम केला आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ 285 रन्सचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला. मात्र बांग्लादेशसमोर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. बांगलादेशचा नवा वेगवान गोलंदाज नाहिद राणा कर्दनकाळ ठरला. त्याने 10 ओव्हर्समध्ये 4 विकेट घेतल्या.






