भारत विरुद्ध बांग्लादेश सामना (फोटो- ट्विटर)
रेणुका सिंग ठाकूरची शानदार गोलंदाजी
दिलारा अख्तर केवळ 4 रन्स करून आउट
राधा यादवने घेतल्या महत्वाच्या 2 विकेट्स
India W Vs Bangladesh W Live Updates: आज भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यात महत्वाचा सामना सुरू आहे. मँचेस्टरच्या स्टेडियमवर आज हे दोन्ही संघ आमनेसामने आले आहेत. बांग्लादेशची कर्णधार निगर सुलतानाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र बांग्लादेशची (Womens T20 World Cup) सुरुवात म्हणावी तशी झाली नाही. अखेर या सामन्यात प्रथम फलंदाजी करून बांग्लादेशने भारताला 137 रन्सचे टार्गेट दिले आहे. भारताने आज अत्यंत अचूक आणि भेदक गोलंदाजी केल्याचे पाहायला मिळाले. राधा यादवने महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या.
बांग्लादेशची फलंदाजी
टॉस जिंकून प्रथम बांग्लादेशने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बांग्लादेशकडून दिलारा अख्तर आणि जुवैरिया फिरदौस यांनी सुरुवात केली. दोघांनी सुरुवात चांगली करून देण्याचा प्रयत्न केला. मात्र दिलारा अख्तर केवळ 4 रन्स करून आउट झाली. तर जुवैरिया फिरदौस ही 33 रन्स करून आउट झाली. शोभाना मोस्तारी आणि कर्णधार निगर सुलताना यांनी बांग्लादेशचा डाव सावरला. निगर सुलताना 32 रन्स करून आउट झाली. तर शोभाना मोस्तारी 22 रन्स वर आउट झाली.
Into the side 🤝 Into the wickets column! Instant impact from Renuka Singh Thakur 👏 Updates ▶️ https://t.co/mWgNXcEkp0#TeamIndia | #T20WorldCup | #WomenInBlue | #INDvBAN pic.twitter.com/VSsaleinGa — BCCI Women (@BCCIWomen) June 25, 2026
भारताची गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी पहिल्या 10 ओव्हर्समध्ये बांग्लादेशला दोन मोठे धक्के दिले. पहिली ओव्हर शेफाली शर्माने टाकली. पहिल्याच ओव्हरपासून भारताने पकड मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. पहिलाच सामना खेळणाऱ्या रेणुका सिंग ठाकूरने दिलारा अख्तरची विकेट पटकावली. तर नंदिनी शर्माने जुवैरिया फिरदौसला आउट केले. राधा यादवने आज शानदार गोलंदाजी केली. राधा यादवने शोभाना मोस्तारी आणि कर्णधार निगर सुलतानाला आउट केले. रेणुका सिंग ठाकूरने देखील अचूक मारा केला. मात्र भारताचे क्षेत्ररक्षण अत्यंत सुमार दर्जाचे पाहायला मिळाले. फील्डर्सने अनेक कॅच सोडल्यामुळे काही रन्सचा फायदा बांग्लादेशला झाला. श्री चरणीने देखील शेवटच्या ओव्हर्समध्ये विकेट घेतल्या.
भारत: शफाली वर्मा, स्मृती मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीकीपर), यास्तिका भाटिया, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, श्री चरणी, क्रांती गौड, नंदनी शर्मा.
IND W Vs BAN W Live: बांग्लादेशने भारताविरुद्ध जिंकला टॉस; प्रथम करणार फलंदाजी
बांग्लादेशचा संघ: जुआयरिया फिरदौस, दिलारा अख्तर, शर्मिन अख्तर, निगार सुलताना,शोभना मोस्तारी, शॉर्ना अख्तर, रितू मोनी, राबेया खातून, नाहिदा अख्तर, मारुफा अख्तर, संजिदा अख्तर मेगला.






