टीसी कॉलेजला कबड्डीत ‘दुहेरी मुकुट’ (फोटो- सोशल मिडिया)
१७ वर्षे वयोगट मुलांच्या संघात समीर नेवसे, युवराज जाधव, आयुष देवकाते, अविनाश खंडागळे, नरेंद्र अवचट, हर्षित पटेल, समर्थ गोसावी, गौरव पारेकर, रोहन बनकर, सार्थक गवंड आणि यश कोकरे यांचा समावेश होता. या सर्व खेळाडूंनी आक्रमक चढाया आणि मजबूत पकडींच्या जोरावर उत्कृष्ट सांघिक खेळाचे दर्शन घडवत अंतिम सामन्यात विजय मिळवून अजिंक्यपद पटकावले.
१९ वर्षे वयोगटातील अंतिम लढतीत यश भोपळे, पार्थ जाधव, ओम साळुंके, यश वाघमोडे, प्रदीप पिसाळ, केशव जगताप, कुणाल भापकर, समर्थ जाधव, साहिल सुपेकर, रुद्राक्ष रहाटे, ओम शिंदे आणि अनुज नलवडे यांनी कौशल्यपूर्ण सांघिक खेळाचे प्रदर्शन केले. चुरशीच्या सामन्यात आक्रमक चढाया आणि भक्कम बचावाच्या जोरावर या संघाने बाजी मारत तालुका विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.या चमकदार कामगिरीच्या जोरावर दोन्ही संघांमधील खेळाडूंची पुणे जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. खेळाडूंना प्रा. डॉ. गौतम जाधव आणि प्रा. अशोक देवकर यांचे बहुमूल्य क्रीडा मार्गदर्शन लाभले.
महाविद्यालयाच्या दोन्ही संघांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह (वाघोलीकर), सचिव मिलिंद शाह (वाघोलीकर), संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. अविनाश जगताप, उपप्राचार्य तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन केले. प्राचार्य डॉ. अविनाश जगताप यांनी खेळाडूंचे कौतुक करत आगामी जिल्हास्तरीय स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी करून विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
‘ये गोल्ड हमारा है!’ भारताशी नडला त्याचा गेम झाला; इराणला नमवत टीम इंडियाने जिंकलं ‘सुवर्ण’






