Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG ODI Series: इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर, Virat Kohli चे कमबॅक; शतकवीर खेळाडू संघाबाहेर

BCCI Announced India Squad For IND vs ENG ODI Series: इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर करण्यात आला आहे. तसेच, आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठीच्या संघात बदल करण्यात आले आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 21, 2026 | 03:09 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
  • विराट कोहलीचे कमबॅक
  • शतकवीर खेळाडूला डच्चू
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रविवारी (दि. २१) इंग्लंडविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. संघाची धुरा शुभमन गिलच्या हाती सोपवण्यात आली आहे. या मालिकेसाठी संघात विराट कोहलीचाही समावेश करण्यात आला आहे, परंतु त्याचा सहभाग त्याच्या फिटनेवर अवलंबून आहे. तसेच, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची देखील निवड करण्यात आली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावणाऱ्या यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळालेले नाही.

IND W vs SA W: भारत-दक्षिण आफ्रिका आमनेसामने, हरमनप्रीत कौर रचणार इतिहास; 200 वा टी20 सामना खेळणार

मालिकेचे वेळापत्रक

भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेतील पहिला सामना १४ जुलै रोजी एड्जबॅस्टन येथे खेळला जाईल. तर, मालिकेतील दुसरा सामना १६ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. तिसरा सामना १९ जुलै रोजी लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. एकदिवसीय मालिकेपूर्वी, दोन्ही संघ १ जुलैपासून पाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळतील, ज्यासाठी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ आधीच जाहीर करण्यात आला आहे.

कोहलीचे खेळणे फिटनेस टेस्टवर अवलंबून

बीसीसीआयच्या समितीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे, परंतु समितीने स्पष्टपणे सांगितले आहे की, या मालिकेत विराट कोहलीचे खेळणे फिटनेस टेस्टवर अवलंबून आहे. कोहलीची फिटनेस टेस्ट २२ जून रोजी बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये येथे होईल. आयपीएल २०२६ च्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध नाबाद ७५ धावा करून विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला विजय मिळवून दिला होता. त्याच सामन्यादरम्यान विराटला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली. या दुखापतीमुळे विराटला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून बाहेर राहावे लागले होते.

कोहली IN हार्दिक OUT

कोहलीचा संघात समावेश करण्यात आला असताना, अष्टपैलू हार्दिक पांड्याला वगळण्यात आले आहे. हार्दिक दुखापतीतून सावरला होता आणि त्याने बीसीसीआय कॉउन्सिल ऑफ इंग्लंडमध्ये सराव सुरू केला होता. एकदिवसीय सामन्यांमध्ये खेळण्यासाठी तो फिट नसल्याने या मालिकेत त्याचा सहभाग अनिश्चित मानला जात होता. हार्दिक दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. म्हणून अफगाणिस्तान दौऱ्यानंतर, त्याला इंग्लंड दौऱ्यासाठीच्या संघातूनही वगळण्यात आले आहे. परिणामी, नितीश रेड्डी यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे.

यशस्वीला संधी नाही, बुमराहचे कमबॅक

अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावल्यानंतरही यशस्वी जैस्वालला संघात स्थान मिळावले नाही. सुरुवातीला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठीही यशस्वीची निवड झाली नव्हती. कोहली दुखापतीमुळे संघाबाहेर गेल्यानंतर यशस्वीला संधी मिळाली. त्याच वेळी, संघाचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह संघात परतल्याने प्रिन्स यादवला बाहेर बसावे लागले आहे.याशिवाय, वेगवान गोलंदाजांमध्ये गुरनूर, हर्षित राणा, प्रसिद्ध कृष्णा आणि अर्शदीप सिंग यांचा संघात समावेश आहे.

जडेजाला विश्रांती?

भारताने संघात पाच वेगवान गोलंदाज आणि चार फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे, पण पुन्हा एकदा रवींद्र जडेजाला संघामध्ये स्थान मिळालेले नाही. यापूर्वी अफगाणिस्तानविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतही जडेजा खेळला नव्हता आणि आता त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही. फिरकी गोलंदाजांमध्ये अक्षर पटेल, कुलदीप यादव, नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांचा संघात समावेश आहे. तर, यष्टीरक्षक म्हणून केएल राहुल आणि ईशान किशन या दोघांनाही संधी मिळाली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघः

शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली*, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, नितीश रेड्डी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, गुरनूर ब्रार

आयर्लंडविरुद्धच्या T20I मालिकेसाठी अपडेटेड संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, तिलक वर्मा (उपकर्णधार), नितीश रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन,रवि बिश्नोई, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रिन्स यादव, वैभव सूर्यवंशी,प्रसिद्ध कृष्णा

Ind A vs Sl A Final: Vaibhav Sooryavanshi ची वादळी खेळी! श्रीलंकेच्या गोलंदाजांना धू-धू धुतले; 20 वर्षांचा विश्वविक्रम मोडला

Web Title: Bcci announced india squad for ind vs england tour three match odi series virat kohli comeback jaiswal dropped

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:24 PM

Topics:  

  • BCCI India
  • ind vs ire
  • India vs England
  • Team India Squad
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?
1

IND vs WI ODI Series: ‘रो-को’ची जोडी पुन्हा मैदानात! Virat-Rohit वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी सज्ज; पहिला सामना कधी-कुठे?

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती
2

BCCI ने Ajit Agarkar चा केला गेम की स्वतःच सोडलं Chief Selector पद? समोर आली मोठी माहिती

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली
3

IPL 2027 Auction: मिनी ऑक्शनचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी होणार लिलाव, स्टार खेळाडूंवर लागणार कोट्यवधींची बोली

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात
4

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.