
BCCI meeting
रोहित शर्माच्या बाबतीत बोलताना बीसीसीआयचे सचिव म्हणाले, ‘रोहित शर्माबाबत गेल्या काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्याच्या निवृत्तीची चर्चा सुरू आहे. रोहित शर्मा चांगले खेळत आहे. त्यामुळे इंटरनेटवर सुरू असणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले पाहिजे.’ त्यांनी रोहित शर्माच्या भविष्याबाबत ठोस भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या प्रतिक्रियेवरून रोहित शर्मा वर्ल्ड कप 2027 खेळणार अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
VIDEO | Mumbai: “No difficulties expected in Japan; Rohit playing superbly,” says BCCI Secretary Devajit Saikia (@lonsaikia), amid speculation that Rohit Sharma could be dropped from the upcoming ODI series against the West Indies. (Full video available on PTI Videos -… pic.twitter.com/kWeU64ZjXq — Press Trust of India (@PTI_News) September 3, 2026
या बैठकीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघाच्या नव्या पर्वातील दोन्ही कर्णधारांनी यात सक्रिय सहभाग घेतला होता. कसोटी आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून बैठकीस उपस्थित राहून त्याने भविष्यातील रणनीती मांडली. टी-२० संघाचा कर्णधार म्हणून उपस्थित राहून त्याने आगामी टी-२० मालिकांबाबत आपले विचार बीसीसीआयसमोर ठेवले. मात्र चीफ सिलेक्टर अजित आगरकर यांची अनुपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. राष्ट्रीय निवड समितीचे प्रमुख असूनही आगरकर या महत्त्वाच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याने क्रिकेट वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत झालेल्या या बैठकीत भारतीय क्रिकेटचा पुढील मार्ग, खेळाडूंचे वर्कलोड मॅनेजमेंट आणि आगामी मोठ्या स्पर्धांची तयारी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते आहे. दोन्ही कर्णधारांनी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांसोबत संघाच्या बांधणीवर सकारात्मक चर्चा केले असल्याचे समजते आहे.
Cricket News: देशांतर्गत क्रिकेटमध्ये आणखी एका संघाची भर? अंदमान-निकोबारबाबत BCCI घेणार मोठा निर्णय
हार्दिक पांड्या २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे, परंतु तो आयपीएलनंतर एकही सामना खेळलेला नाही. हार्दिक पांड्याने बंगळूरमध्ये एक घर भाड्याने घेतले असून तो सीओई (COE) मध्ये प्रशिक्षण घेत आहे. संघ व्यवस्थापन आणि निवड समिती हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत की, सीओई (COE) त्याला १० षटके गोलंदाजी करण्यासाठी तंदुरुस्त कधी घोषित करेल.