भुवनेश्वर कुमार (फोटो -ians)
भारतीय संघ या महिन्याच्या शेवटी न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात वनडे सिरिज, टी 20 सिरिज, टेस्ट सिरिज खेळवली जाणार आहे. याची सुरूवात टी 20 सिरिजपासून होणार आहे. बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. यामध्ये वेगान गोलंदाज भुवनेश्वर कुमारचे देखील चार वर्षांनी पुनरागमन झाले आहे.
भुवनेश्वर कुमार बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर होता. त्याने आपला शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना २२ नोव्हेंबर २०२२ रोजी न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. आता तो तब्बल चार वर्षांनी न्यूझीलंडविरुद्धच पुनरागमन करणार आहे. शेवटच्या टी 20 सामन्यात भुवनेश्वरने 4 ओव्हरमध्ये 35 रन्स देत 1 विकेट घेतली होती. न्यूझीलंडच्या खेळपट्ट्यांवर हवामानामुळे चेंडू स्विंग होतो. तिथे भुवीसारख्या अनुभवी स्विंग गोलंदाजाची भूमिका अत्यंत ठरणार आहे. त्यामुळे त्याला संधी देण्यात आल्याचे म्हटले जात आहे.
न्यूझीलंडच्या कठीण परिस्थितीत भारतीय युवा गोलंदाजीला मार्गदर्शन करण्यासाठी भुवनेश्वर कुमारचा अनुभव मोलाचा ठरणार आहे. पॉवरप्लेमध्ये सुरुवातीला विकेट्स मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. आयपीएलमध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने गोलंदाजीत अत्यंत शानदार असे प्रदर्शन केले होते. त्यामुळे त्याच्या कामगिरीची दखल घेत भुवनेश्वर कुमारला बीसीसीआयने भारतीय संघात पुन्हा स्थान दिले आहे.






