
शुभमन गिल करणार भारताचे नेतृत्व
6 जून ला भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी खेळणार
भारतीय संघाचा सरावाचा व्हिडिओ व्हायरल
IND Vs AFG Viral Video: आयपीएल 2026 चा थरार संपला आहे. आता लवकरच भारतीय क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. भारताचा संघ अफगाणिस्तानविरुद्ध एकमेव कसोटी सामना आणि 3 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी सामना 6 जूनपासून सुरू होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
6 जूनपासून भारत अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळणार आहे. न्यू चंदिगढ येथील महाराजा यादविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम (मुल्लानपूर) येथे खेळवला जाईल. दरम्यान बीसीसीआयने भारतीय संघाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये भारतीय खेळाडू कसोटी सामन्याचा सराव करताना दिसून येत आहेत.
IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट
बीसीसीआयने टीम इंडियाचा एक व्हिडिओ शेयर केला आहे. ज्यामध्ये भारताचा संघ फिल्डिंगचा सराव करताना दिसून येत आहे. त्यानंतर खेळाडू फलंदाजी करताना दिसून येत आहे.
Back to Test Cricket 🤍 🎥 #TeamIndia hits the nets as the red ball grind gets underway ahead of the #INDvAFG Test 🏏@IDFCFIRSTBank pic.twitter.com/bD3z1osQcB — BCCI (@BCCI) June 3, 2026
नेटमध्ये कुलदीप यादव आणि केएल राहुल आणि दुसरे स्पिनर्स सराव करताना दिसत आहेत. केएल राहुल आणि यशस्वी जयस्वायल देखील सराव करत आहेत. तर शेवटी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर देखील पाहायला मिळत आहे.
भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा?
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील बहुप्रतिक्षित क्रिकेट मालिका आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. टीम इंडिया प्रथम पांढऱ्या जर्सीत आणि त्यानंतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी निळ्या जर्सीत मैदानात उतरणार आहेत. भारतीय संघ प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.
भारत आणि अफगाणिस्तान सामने कुठे पाहता येणार?
जर तुम्हाला टीव्हीवर भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यांचा आस्वाद घ्यायचा असेल तर तुम्ही स्टार स्पोर्ट्स या चॅनलवर पाहू शकणार आहात. तसेच मोबाइल युजर्ससाठी हा सामना जिओ हॉटस्टार या अधिकृत ॲपवर पाहता येणार आहे.
IND vs AFG: टीव्ही की मोबाईल? भारत-अफगाणिस्तान कसोटी सामना कुठे बघायचा? वाचा सविस्तर
भारताचा कसोटी संघ: शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, के.एल. राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
भारताचा एकदिवसीय सामन्यांचा संघ: शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), के.एल. राहुल, ईशान किशन, हार्दिक पांड्या, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, प्रिन्स यादव, गुरनूर ब्रार, हर्ष दुबे.