Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“भारताकडून खेळायचे असेल तर…,”BCCI ने दिला रोहित शर्मा आणि विराट कोहलीला सज्जड दम; दिग्गजांचे भवितव्य संकटात 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इशारा देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Nov 12, 2025 | 04:52 PM
"If you want to play for India..." BCCI gives Rohit Sharma and Virat Kohli a boost; The future of the veterans is in danger

"If you want to play for India..." BCCI gives Rohit Sharma and Virat Kohli a boost; The future of the veterans is in danger

Follow Us
Follow Us:
  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा विराट आणि रोहितला इशारा
  • आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल 
  • रोहित शर्माकडून विजय हजारे ट्रॉफीसाठी उपलब्ध असण्याची माहिती 
BCCI’s message to Virat Kohli and Rohit Sharma : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना इशारा देण्यात आला आहे. हा इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहण्याबाबत आहे.  जर या दोन अनुभवी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे असेल तर त्यांना विजय हजारे ट्रॉफीमध्ये देशांतर्गत क्रिकेट सामने खेळावे लागणार असे बीसीसीआयने कळवण्यात आले आहे.

रोहित शर्मा आणि विराट कोहलीने २९ जून २०२४ रोजी टी-२० क्रिकेटमधून आणि मे २०२५ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता ते फक्त एकदिवसीय क्रिकेटमध्येच सक्रिय आहेत. दोन्ही खेळाडू ऑक्टोबर २०२५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत खेळले होते. या मालिकेत रोहितने दुसऱ्या सामन्यात अर्धशतक आणि तिसऱ्या सामन्यात नाबाद शतक ठोकून आपली क्षमता पुन्हा एकदा दाखवून दिली होती. तर विराट कोहलीने तिसऱ्या सामन्यात नाबाद अर्धशतक ठोकले होते. तथापि, असे असून देखील, भारतीय संघाने एकदिवसीय मालिका १-२ ने अशी गमावली होती.

हेही वाचा : IND vs SA Test series : WTC साठी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका ठरणार महत्त्वाची : मोहम्मद सिराज

 खेळायचे असेल तर तुम्हाला देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार

इंडियन एक्सप्रेसने बीसीसीआयच्या एका सूत्राचा हवाला देत सांगितले की, बोर्ड आणि संघ व्यवस्थापनाने दोघांना देखील सांगितले की जर त्यांना भारताकडून खेळायचे असेल तर त्यांना देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागणार आहे. रोहित आणि कोहली दोन्ही फॉरमॅटमधून निवृत्त झाले असल्याने, त्यांना तंदुरुस्त राहण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल.

रोहित शर्माकडून विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या उपलब्धतेची माहिती मुंबई क्रिकेट असोसिएशनला देण्यात आली आहे.  कोहलीच्या सहभागाची अद्याप पुष्टी झालेली नाही. कोहली शेवटचा २०१० मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळलेला आहे. कोहली शेवटचा विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्व्हिसेसविरुद्ध खेळला होता.

हेही वाचा : PAK vs SL : इस्लामाबादमधील आत्मघातकी हल्ल्यानंतर श्रीलंकन संघाच्या सुरक्षेत वाढ! हल्ल्यात १२ जणांचा मृत्यू

याव्यतिरिक्त, रोहित शर्माने मुंबई क्रिकेट असोसिएशनला सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेसाठी देखील त्याच्या उपलब्धतेची माहिती दिली आहे. ही देशांतर्गत टी-२० स्पर्धा २६ नोव्हेंबरपासून खेळवण्यात येणार आहे. तथापि, ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमुळे रोहितच्या या टी-२० स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघ घोषित केलेला नाही. तरी, रोहित शर्माचे संघात पुनरागमन निश्चित मानले जात आहे. त्याने ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या बॅटने शानदार कामगिरी केली होती.

Web Title: Bcci warns rohit and kohli against playing domestic cricket

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 04:52 PM

Topics:  

  • bcci
  • ICC
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?
1

श्रीलंका दौऱ्यानंतर Ajit Agarkar ची खुर्ची जाणार? BCCI घेणार भवितव्याचा निर्णय; रोहित शर्मा वादाचीही होणार चर्चा?

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?
2

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?
3

IND vs SL 1st Test: लंका पेटवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! शुभमन गिलची खरी कसोटी; किती वाजता सुरू होणार सामना?

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
4

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.